मुंबईतील प्रत्येक वॉर्डाला ‘युनिक’ रंगाची ओळख, दादरला ‘भगवा’ तर माहिमला ‘हिरवा’ रंग, ‘मायानगरी’ रंगणार 24 रंगात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उद्या दादरचे फुटपाथ भगवे किंवा माहीम मध्ये हिरव्या रंगाचे बोर्ड दिसले तर नवल वाटून घेऊन नका. कारण मुंबईत प्रत्येक प्रभागाला एक विशिष्ट रंग देण्याचा पालिका विचार करतेय. मुंबई मध्ये २४ प्रभागापैकी पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई शहरात येणाऱ्या 15 प्रभागाना हे विशिष्ट रंग दिले जाणार आहेत . सध्या तरी कुठल्या प्रभागाला कुठला रंग दिला जाईल हे ठरवलं गेलं नसून त्यावर विचार केला जात आहे. रस्ते दुभाजक,भिंती ,फुटपाथ , दिशादर्शक फलक या सर्वाना एकच रंग देणार आहेत. पण कोणता रंग दिला जाणार आहे याबाबत कोणताही निर्णय झालेले नाही .

आत्ता तरी त्याबाबत वॉर्ड ऑफिसरना किती खर्च येणार आहे याच अंदाजपत्रक तयार करायला सांगितलं आहे. मुंबई शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे अंदाज पत्रक तयार झाल्यावर सुपूर्द केलं जाईल. जिल्हाधिकारी हा सगळा खर्चाचा भार उचलणार आहेत. त्यानंतर वॉर्ड ऑफिसर, नगरसेवक यांच्या एकत्रीत संमतीने कोणत्या रंग कोणत्या वॉर्डला दिला जाणार हे ठरवलं जाणार आहे.

कोलकाता शहराला निळ्या रंगात रंगवण्याचं काम पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे . कोलकाता मध्ये एकच रंग मात्र पालिकेने मुंबई ला २४ रंगात रंगवण्याचं ठरवलं आहे. मुंबई प्रत्यक्ष विविध रंगात दिसणार आहे . पालिकेच्या मुख्यालयाबाहेरच्या फूटपाथवर असंख्य गाड्या पार्क करून ठेवल्या जातात, अंतर्गत रस्त्यावर गाडी चालेल की नाही अशी स्थिती आहे. उघड्या गटारांची घाण झोपडपट्टीतील राहिवाशाच जिणं नकोस करतेय. मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर बेकायदेशीर गाड्या उभ्या आहेत ज्या ट्रॅफिक जॅम करतायत लोकांस सोयीसुविधा उपलब्द नाहीत आणि २४ वॉर्डना २४ रंगानी रंगवून पालिकेला काय साधायचं आहे. असा प्रश्न पालिकेला विचारला जातोय .