Brihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय चिंताजनक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सूर्य, गुरू आणि शनी यावेळी मकर राशीत सोबत विराजमान आहेत. 7 जोनवारीला शनी अस्त आहे आणि आता 17 जानेवारीला गुरू सुद्धा अस्तंगत झाला आहे. गुरू मार्गस्थ झाल्याने यावेळी शुभकार्य बंद होतील. ज्योतिषतज्ज्ञांनुसार, हे दोन ग्रह अस्त झाल्याने देश-जगावर मोठा परिणाम होईल. सोबतच वेगवेगळ्या राशींना चांगले-वाईट परिणाम सुद्धा मिळतील. मेष, वृषभ, तुळ, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या जातकांंनी जास्त सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

मेष –
आळस वाढेल. अनावश्यक चिंता सतावतील. मान-सन्मान कमी होईल. छोट्या बहिण-भावासोबत वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. खर्चात वाढ होऊ शकते, विनाकारण खर्च करणे टाळा. वडीलांसोबत संबंध बिघडण्याची शक्यता आहे, वाणीवर नियंत्रण ठेवा. पिवळ्या रंगाचा वापर लाभदायक ठरेल.

वृषभ –
आरोग्य आणि मानसिक स्थितीवर खास लक्ष देण्याची आवश्यकता असेल. पैशांची देवाण-घेवाण करताना सतर्कता बाळगा. भाग्य स्थानात गुरु अस्त होत आहे, भाग्याच्या भरवशावर न बसता, प्रयत्न करा. पैशावर नियंत्रण ठेवा अन्यथा खर्च वाढू शकतो. केळ्यांचे दान करा.

मिथुन –
करियर आणि व्यापरात निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक जीवनाकडे लक्ष द्या. जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर सध्या ही योजना पुढे ढकला. या काळात कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा नुकसान होईल. पैशावर नियंत्रण ठेवा. शंकराची उपासना केल्यास लाभ मिळेल.

कर्क –
या दरम्यान फसव्या लोकांपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात काही वाद होऊ शकतो. एखाद्या कामात अडचण आल्याने मानसिकदृष्ट्या त्रस्त होऊ शकतो. यासाठी या काळात प्रत्येक काम खुप सावधगिरीने करा, जेणेकरून पुढे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पिवळ्या रंगाचा जास्त वापर करा.

सिंह –
संपत्तीच्या वादात पडू नका आणि आरोग्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक जीवनाकडे लक्ष ठेवा. घरातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. कोर्ट-कचेरीच्या फेर्‍या माराव्या लागू शकतात. यासाठी वाद-विवादाच्या कामांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. हळदीचा टीळा लावा.

कन्या –
नात्यात समस्या आणि दुराव्याचे योग आहेत. करियरच्या बाबतीत अडचणी वाढू शकतात. संतती प्राप्तीची इच्छा असणार्‍यांना या काळात समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना या काळात जास्त मेहनत करावी लागेल, अन्यथा अडचणी येतील. शंकराची उपासना लाभदायक ठरेल.

तुळ –
गुरू अस्तानंतर कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या आणि आरोग्याकडे लक्ष द्या. मान सन्मान कमी होऊ शकतो. नवी नोकरी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. व्यापारात गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर सध्या थांबणे तुमच्यासाठी चांगले ठरेल. यावेळी कोणत्याही प्रकारच्या मंगल कार्याचे आयोजन करू नका. आरोग्य चांगले राहील. पिवळ्या वस्तूंचे दान लाभादायक राहील.

वृश्चिक –
या दरम्यान पैशांच्या हानीपासून दूर राहा. संततीबाबत समस्या निर्माण होऊ शकते. वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणतेही कार्य खुप विचारपूर्वक करा. अतिराग येऊ शकतो, यासाठी कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका. वादाच्या विषयांपासून दूर राहा. सोने किंवा पितळ धारण केल्याने लाभ होईल.

धनु –
गुरूच्या अस्त राहण्यापर्यंत आपली सर्व कामे टाळा. प्रवासात विशेष सावधगिरी बाळगा. या काळात कुटुंबात थोडा वाद होऊ शकतो. नातेवाईकांशी वाद होऊ शकतो. कोणतेही महत्वाचे काम करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला आवश्य घ्या. मोठ्यांच्या मदतीने तुमचे कार्य योग्य दिशेने पुढे सरकेल. कोणताही महत्वाचा निर्णय या काळात घेऊ नका. गुरूच्या मंत्राचा जप करा.

मकर –
आरोग्य आणि तणाव अडचणी वाढू शकतात. करियरमध्ये निष्काळजीपणा करू नका. तुमच्या राशीत गुरु अस्त होत आहे, यासाठी आरोग्याबाबत सर्वात जास्त सावध राहणे आवश्यक आहे. आरोग्यात गडबड झाल्याने पैशांचा खर्च वाढू शकतो. आपल्या आर्थिक आणि कौटुंबिक जीवनाबाबत सतर्क राहा. पिवळ्या वस्तू टाळा.

कुंभ –
आरोग्य आणि मानसिक स्थितीकडे लक्ष द्या. विचारपूर्वक कोणताही मोठा निर्णय घ्या. परदेशाशी संबंधीत कोणतेही काम सध्या करू नका, ते पुढे ढकला. आपले प्रत्येक काम खुप सावधगिरीने आणि विचारपूर्वक करा. अपघातापासून दूर राहा. निळ्या वस्तू शुभ फळ देऊ शकतात.

मीन –
पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते. मनातील चिंता वाढू शकतात. मीन राशीच्या लोकांनी या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळावे. कोणतेही महत्वाचे काम करताना अगोदर पार्टनर किंवा आयुष्याच्या जोडीदाराचा सल्ला आवश्यक घ्या, यामुळे फायदा होईल. कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर 15 फेब्रुवारीपर्यंत तो टाळा. गुरूच्या मंत्राचा जप करा.