‘या’ बंगाली अभिनेत्रीचे रेल्वे, बस स्थानकावर झळकले ‘अश्लील’ फलक ; अभिनेत्रीचा राग अनावर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अनेकवेळा प्रसिद्ध अभिनेत्र्यांचे वैयक्तिक नंबर सार्वजनिक केले गेल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. असाच एक प्रकार बंगाली मलिकेत काम जाणाऱ्या ब्रिष्टी रॉय या अभिनेत्रींच्या बाबतीत घडला आहे. यांना मागच्या काही दिवसांपासून अनोळखी क्रमांकावरून पुरुषांचे फोन येत आहेत. फोने करून लोक अतिशय अश्लील भाषेत बोलत असल्याचे समजते. काही जण तर या अभिनेत्रीला कॉल गर्ल सारखे प्रश्न विचारत आहेत. मागच्या काही दिवसापासून कोलकाता शहरामधील बसस्थानक, रेल्वे स्थानकावर यांचा वैयक्तिक नंबर, नाव आणि फोटोसहित फलक लागले आहेत. अनेकजण अभिनेत्रीला एस्कॉर्ट समजत आहेत.

ब्रिष्टी रॉय म्हणाल्या की, मला मागच्या २४ ऑगस्ट पासून असे फोन येत आहेत. सुरवातीला मला वाटलं की, कोणीतरी माझी मस्करी करत असेल परंतु, नंतर मला माझ्या एका मैत्रिणीने फोन करून सांगितले की, रेल्वेमधील एका एस्कॉर्ट जाहिरातीत माझी वैयक्तिक माहिती आणि संपर्क क्रमांक सार्वजनिक केला गेला आहे.

एस्कॉर्ट समजून फोन येत होते
अनेकजण मला एस्कॉर्ट सेवेचा दर विचारात होते. लोकांना विचारलं असताना ते म्हणाले, हा नंबर एस्कॉर्ट सेवेच्या जाहिरातीतून भेटला आल्याचे त्यांनी सांगितले. मी माझा फोन नंबर बदलण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु असल्यामुळे मला असे करता आले नाही. तसेच माझे काही संपर्क क्रमांकही या सिम कार्ड मध्ये आहेत. ब्रिष्टी म्हणाली की, मी एकदम निर्दोष आहे. असा काही प्रकार घडला असल्याचे मला अनोखी पुरुषांकडून फोन यायला सुरवात झाल्यानंतर समजले. तसेच मला मुद्दामहून त्रास देण्यासाठी कोणीतरी खोड काढली असावी.

बंगाली चित्रपट केले होते काम
पण मी ज्यांनी कोणी हा प्रकार केला असेल त्याला सहजपणे सोडणार नाही. दोषी व्यक्ती लवकरच पकडला जाईल असा मला विश्वस आहे. रॉय यांनी सोनारपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची रीतसर तक्रार दाखल केली आहे. ब्रिष्टी हीने ‘बो कोठा काओ’, ‘सुबर्णलता’ ‘तुमई अमाई माईल’, आणि ‘भूमिकन्या’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. ब्रिष्टीने बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. घडलेल्या या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक राशिद खान म्हणाले की, या घटनेचा सध्या तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अशा प्रकारे एखाद्याचे वैक्तिक माहिती सार्वजनिक करणे हा गुन्हा आहे. गुन्हेगाराला सजा मिळणे अतिशय गरजेचे आहे.