‘हे’ जोडप विना परवाना ड्रोन शॉट घेतल्यामुळं ‘गोत्यात’, झाली 10 वर्षाची जेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणमध्ये विना परवानगी ड्रोनद्वारे शूट केल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ईरान में कपल ने बिना लाइसेंस लिया ड्रोन शॉट, 10 साल की हुई जेल

ऑस्ट्रेलियन सरकारने याची पुष्टी केली असून ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेले मार्क फिर्किन आणि जोली किंग यांना इराणमध्ये अटक करण्यात आली आहे. जुलै महिन्यात दोघांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

ईरान में कपल ने बिना लाइसेंस लिया ड्रोन शॉट, 10 साल की हुई जेल

जोली किंग हिच्याजवळ ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या दोन देशांची नागरिकता आहे. या युगुलाने विना परवानगी इराणमध्ये ड्रोन उडवल्याने त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी सुरुवातीला लायसन्स काढणे गरजेचे आहे.

ईरान में कपल ने बिना लाइसेंस लिया ड्रोन शॉट, 10 साल की हुई जेल

या युगलाचे युट्युब वर मोठ्या प्रमाणात सब्सक्राइबर आहेत. त्यांचे 21600 सब्सक्राइबर असून त्यांच्या एका लोकप्रिय व्हिडिओला 150,000 व्ह्यूज असून पाकिस्तानमधील काराकोरम हायवेवर त्यांनी तो शूट केला होता. त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात दक्षिण पूर्व आशिया मधून केली होती त्यानंतर त्यांचे शेवटचे ठिकाण हे ब्रिटन होते.

ईरान में कपल ने बिना लाइसेंस लिया ड्रोन शॉट, 10 साल की हुई जेल

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या कारागृहात बंद असलेल्या आपल्या नागरिकाला सोडवण्यासाठी इराणने ऑस्ट्रलियाच्या या युगलाला अटक केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ईरान में कपल ने बिना लाइसेंस लिया ड्रोन शॉट, 10 साल की हुई जेल

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like