‘इंग्लंड’च्या निवडणूकीत ‘हिंदी’, ‘हिंदू’ आणि ‘हिंदुस्थान’चा मुद्दा ट्रेन्डमध्ये, जाणून घ्या (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनच्या निवडणूकीत हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान हे मुद्दे जोर धरत आहेत. ब्रिटनमध्ये गुरुवारी निवडणूका आहेत आणि शुक्रवारी निवडणूकींचे निकाल लागतील. या वेळी निवडणूकीत तेथील दोन्ही पक्ष भारतीयांना आकर्षित करत आहेत. निवडणूकीच्या प्रचारात जालियनवाला बाग हत्याकांडपासून काश्मीर मुद्यापर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले जाते आहेत.

बोरिस जॉन्सन यांच्यासंबंधित नुकतेच एक गाणे व्हायरल होत आहे. गाण्याला काॅंझर्व्हेटिव पार्टीला भारतीय वंशाचे उमेदवार शैलेश वारा यांनी ट्विट करत प्रसिद्ध केले. गाण्यात बोरिस जॉन्सन यांना जिंकवण्याचे आवाहन केले आहे. यात त्यांनी लेबर पार्टीचे नेते जेरमी कॉर्बिन यांच्या विरोधात देखील टीका केली आहे.

गाण्याचे बोल आहेत – जागो, जागो, जागो… चुनाव फिर से आया है… बोरिस को हमें जिताना है… इस देश को हमें दिखाना है… कुछ करके हमें दिखाना है.

गाण्याचा व्हिडिओमध्ये बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर पंतप्रधान मोदी देखील दिसत आहेत. या गाण्याच्या माध्यमातून मोदी प्रशंसक आणि भारतीय वंशाच्या लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या व्हिडिओवर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.

निवडणूकीत भारतीयांची भूमिका महत्वाची –
यासंबंधित निवडणूकीत भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे लोक महत्वाची भूमिका निभावतील. पहिल्यांदा विशेष करुन दक्षिण अशियायी वंशाच्या लोकांना लेबर पार्टीचे समर्थक मानले जात होते. आता ही परिस्थिती बदलली आहे. भारतीत मूळ लोक पार्टीचे समर्थक मानले जातात. तर पाकिस्तानी मूळ लोक लेबर पार्टीचे समर्थक मानले जातात.

लेबर पार्टीने दक्षिण अशियाई लोकांना आकर्षित करण्यासाठी निवडणूकीच्या घोषणापत्रात आश्वासन दिले आहे की जर ते सत्तेत आले तर जालियनवाला बाग प्रकरणात ब्रिटन सरकार त्यांची माफी मागेल. याबरोबरच आश्वासन देण्यात आले आहे की ब्रिटनच्या शाळांमध्ये ब्रिटिशांकडून करण्यात आलेल्या अत्याचारांचे शिक्षण देण्यात येईल.  असे सांगण्यात येत आहे की दक्षिण अशियायी लोकांना लेबर पार्टीकडून आश्वासन देण्यात आले की काश्मीर मुद्द्यावर लक्ष घालू.

काश्मीर प्रकरणावरून लेबर पार्टीवर नाराज भारतीय वंशाचे लोक –
लेबर पार्टीने काश्मीर मुद्याच्या कलम 370 ला विरोध केला होता. तर काॅंझर्व्हेटिव पार्टीने याबाबत सांगितले की काश्मीरमधून 370 कलम रद्द करणं हे त्यांचे अंतर्गत प्रकरण आहे. हे प्रकरण त्यांच्यावर सोपवले पाहिजे. काॅंझर्व्हेटिव पार्टीच्या या मतामुळे भारतीय मूळ लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. यानंतर पाकिस्तान आणि बांग्लादेशचे लोक लेबर पार्टीकडे आकर्षित झाले.

मागील आठवड्यात बोरिस जॉन्सन लंडनच्या स्वामी नारायण मंदिरात गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांची सहचारिणी सेमंड्स देखील होत्या. केरी सेमंड्सने भारतीयांना आकर्षित करण्यासाठी साडी घातली होती. या प्रसंगी बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की मला माहिती आहे की पंतप्रधान मोदी एक नव्या भारताचा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण युके मध्ये राहत असताना त्यांचे समर्थन केले. युकेमध्ये कोणत्याही नक्षलवादी आणि अँटी इंडिया सेंटिमेंटला जागा मिळणार नाही.

बोरिस जॉन्सन यांनी जुलैमध्ये सत्तेत येताच मूळ भारतीय लोक प्रीती पटेल, आलोक शर्मा आणि ऋषि सुनक यांना मंत्रिमंडळात जागा दिली होती. यानंतर बोरीस यांचे भारताच्या कनेक्शन संबंधित अनेक प्रकरणे समोर आली.

मूळ भारतीयांचा निवडणूकीत भाग
2011 च्या लोकसंख्येनुसार ब्रिटनची एकूण लोकसंख्या 6 कोटी आहे. यातील जवळपास 2.5 टक्के भारतीय आहेत. एका आकडेवारी नुसार भारतीय मूळ लोकांची संख्या 15 लाखाच्या आसपास आहे, यातील 5 लाख शिख आहेत, 3 लाख भारतीय मुस्लिम आहेत आणि 1 लाख दक्षिण भारतीय आहेत.

असे सांगण्यात येत आहे की हिंदुस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशी मूळ जवळपास 30 लाख लोक ब्रिटनच्या संसदेत 48 जागांवर परिणाम करतात. यंदा भारतीयांचे मतदान काॅंझर्व्हेटिव पार्टीकडे जाण्याची शक्यता आहे. शिख जनसमुदायाबरोबर सांगण्यात येते की ते कायम लेबर पार्टीबरोबर असतात, यंदा देखील लेबर पार्टीचे समर्थन करतील.

गुजराती भारतीय लोक, मुस्लिम सोडून लेबर पार्टीला समर्थन देतात. दक्षिण भारतीय मूळ लोकांचे मत यंदा वाटले जाण्याची शक्यता आहे. मागील निवडणूकीत दक्षिण अशियायी मूळ लोकांमधील 12 उमेदवार निवडणूक जिंकले होते. यात लेबर पार्टीचे 7 तर काॅंझर्व्हेटिव पार्टीचे 5 उमेदवार विजयी झाले होते.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like