Covid-19 मुळं क्वारंटाइन झाल्यास आता मिळणार पैसे, ब्रिटनमध्ये सुरू झाली नवी योजना

लंडन : कोरोना व्हायरस महामारीमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. संकटामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. नोकरी करणारे आणि उद्योग व्यवसाय करणार्‍यांच्या उत्पन्नावर वाईट परिणाम झाला आहे. संकटाच्या या काळात ब्रिटनच्या सरकारने कोविड-19 मुळे क्वारंटाइन झाल्यास पैसे देण्यासाठी पायलट प्रोजेक्ट लाँच केला आहे. या योजनेंतर्गत कमी उत्पन्नवाल्या मजूरांना कोरोना व्हायरस संक्रमित झाल्यास किमान दहा दिवस क्वारंटाइन व्हावे लागल्यास सरकार आर्थिक मदत देणार आहे.

उत्तर इंग्लडच्या डार्वेन, पेंडले, ओल्डममध्ये कोरोना व्हायर संसर्गाचा धोका सर्वात जास्त आहे. या योजनेत 10 दिवसांच्या सेल्फ आयसोलेशनसाठी 130 पौंड दिले जातील. म्हणजे प्रत्येक दिवशी 13 पौंड दिले जातील. यामध्ये घरातील अन्य सदस्य आणि जे जवळचे लोक आहेत, ज्यांना 14 दिवसासाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये रहावे लागल्यास, त्यांना 182 पौंड दिले जातील.

ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की, ज्यांचे उत्पन्न कमी आहे आणि कोरोना संक्रमित झाल्याने क्वारंटाइन व्हावे लागले, ज्यामळे त्यांचे काम बंद झाले, अशा लोकांना नव्या योजनेमुळे मदत होईल. ब्रिटिश जनतेने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात खुप मदत केली आहे.

लंडन सरकारच्या हेल्थ अँड सोशल केयर विभागाने म्हटले की, कोरोना संक्रमित व्यक्तीला या योजनेंतर्गत 48 तासांच्या आत पैसे दिले जातील.