पुन्हा एकदा बाप झाला आमिर खान, पत्नीनं दिला एका ‘गोंडस’ मुलाला जन्म

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  आमिर खानच्या घरी नवा पाहुणा आल्यानं त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. गेल्या शनिवारी म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी आमिर खान एका मुलाचा बाप झाला आहे. आमिर घरी आलेला हा नवीन पाहुणा म्हणजे त्याचं तिसरं आपत्य आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही बॉलिवूड स्टार आमिर खानबद्दल बोलत आहोत. परंतु असं अजिबात नाही. आम्ही ज्या आमिर खानबद्दल बोलतोय तो आहे पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश बॉक्सर.

आमिर खाननं स्वत: ट्विट याबाबत माहिती दिली आहे. त्याच्या चाहत्यांना या बातमीनं आनंद झाला आहे. त्याला अनेकजण शुभेच्छा देताना दिसत आहेत. आपल्या पोस्टमध्ये आमिर खान म्हणतो, “माझा सुंदर मुलगा मोहम्मद जवियर खानचा जन्म 22 फेब्रुवारी 2020 रोजी झाला. त्याचं वजन 7 पाऊंड आहे.”

आमिर खानच्या बायकोचं नाव फरयाल मखदुम आहे. आमिर आणि फरियाल यांना आधी दोन मुली आहेत. यानंतर आता त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे. एकेकाळी फरयाल आणि आमिर यांच्यात वाद एवढा विकोपाला गेला होता की, 2017 साली दोघांच्या वेगळं होण्याच्या बातम्याही समोर येत होत्या. परंतु आमिरनं नंतर सांगितलं होतं की, त्याच्या बायकोनं तडजोड केली आहे आणि आता वाद मिटला आहे.

33 वर्षीय आमिर आणि फरयाल 2013 मध्ये विवाहबद्ध झाले होते. गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये तो बाप झाला होता. आमिर आणि त्याचे कुटुंब आता त्याला पुन्हा मुलगा झाल्यानं खूप खुश आहेत. आमिर खानं बॉक्सिंग रिंगमध्ये 34 किताब जिंकले आहेत. 2003 साली ज्युनियर ऑलिम्पिक गेम्समध्ये त्यानं गोल्ड मेडलही जिंकलं आहे.

View this post on Instagram

@jewelsbynazish 💎

A post shared by Faryal Makhdoom Khan (@faryalmakhdoom) on

View this post on Instagram

Happy anniversary baby boo 💕 #6yearsdown

A post shared by Faryal Makhdoom Khan (@faryalmakhdoom) on

View this post on Instagram

Gucci gang 💋

A post shared by Faryal Makhdoom Khan (@faryalmakhdoom) on

View this post on Instagram

Cover Shoot✨#OK

A post shared by Faryal Makhdoom Khan (@faryalmakhdoom) on

You might also like