ब्रिटनच्या ‘या’ कंपनीनं सुरू केलं ‘कोरोना’च्या वॅक्सीनचं उत्पादन, तयार करणार 2 अरब ‘डोस’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अ‍ॅस्ट्रॅजेनेका पीएलसी ( AstraZeneca Plc ) या औषध कंपनीने कोरोना विषाणूची संभाव्य लस तयार करण्यास सुरवात केली आहे. कंपनीच्या पास्कल सोरिअट यांच्या हवाल्याने एका अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस लसीची चाचणी चालू आहे, परंतु कंपनीने उत्पादन यासाठी सुरू केले आहे, जेणेकरून मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात मदत होईल. या अहवालात सोरियट म्हणाले, ‘आम्ही या लसीचे उत्पादन यापूर्वीच सुरू केले आहे. जोपर्यंत निकाल मिळतील, तोपर्यंत आम्ही लस सोबत तयार असू. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने म्हंटले की, ते कोविड – 19 लसचे दोन अब्ज डोस उपलब्ध करून देतील.

कंपनीने उचलला मोठा धोका
पास्कल सोरिअट म्हणाले की, आम्ही प्रथम उत्पादन सुरू केले जेणेकरून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाऊ शकेल. ते पुढे म्हणाले की, हा निर्णय आमच्यासाठी जोखीम आहे, परंतु ही एक आर्थिक जोखीम आहे. जेव्हा ही लस काम करणार नाही, तेव्हाच आम्हाला नुकसान होईल. त्या वेळी आमचे सर्व मटेरियल, सर्व लस निरुपयोगी ठरतील. तसेच ते म्हणाले की, सध्याच्या साथीच्या रोगात आम्ही या लसीपासून नफा मिळवण्याचा विचार करीत नाही. जर ही लस काम करत असेल तर कंपनी सुमारे 2 अब्ज डोस तयार करेल. गुरुवारीच कंपनीने दोन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, त्यातील एक बिल गेट्ससोबतही आहे.

भारतीय कंपनीबरोबरही करार
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या सहकार्याने अ‍ॅस्ट्रॅजेनेका ही लस विकसित करीत आहे. कंपनीने ठरवले आहे की, एकूण लसांपैकी निम्मे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना पुरवले जाईल. कंपनीचा दुसरा साथीदार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) आहे, जी वॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आहे. कंपनीने बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या दोन संस्थांशी 750 कोटी डॉलर्सचा करार केला आहे.

लसीच्या पुरवठा साखळीवरही काम करतेय कंपनी
सोरियअला ऑगस्टपर्यंत AZD1222 लसीच्या परिणामाबद्दल माहिती मिळण्याची आशा आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी झालेल्या कराराअंतर्गत 1 अब्ज लस देण्याची चर्चा आहे. या वर्षाअखेरीस 40 कोटी डोस देण्याची चर्चा देखील झाली आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका आता संपूर्ण जगभरात ही लस देण्यासाठी पुरवठा साखळीवर काम करत आहे.

400 दशलक्ष डोस अमेरिका आणि यूकेला पुरविला जाईल
लस यशस्वी झाल्यानंतर औषध कंपन्यांसमोर सर्वात मोठे आव्हान मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि पुरवठ्यावर असेल. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने अमेरिकेला 300 कोटी आणि युनायटेड किंगडमला 100 कोटी लस देण्याचे वचन देखील दिले आहे. ही लस यशस्वी ठरल्यास सप्टेंबरपर्यंत त्याची पहिली डिलिव्हरीही केली जाईल. दरम्यान ,कोरोना विषाणूची लस तयार करण्यासाठी जगभरातील सरकारे कोट्यवधी डॉलर्स खर्च करत आहेत. तसेच फार्मा कंपन्याही वेगाने लस तयार करण्यात व्यस्त आहेत.