धक्कादायक ! महिलेला समुद्र किनाऱ्यावर सापडला ‘लादेनचा’ चेहरा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेला समुद्र किनाऱ्यावर अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनचा चेहरा सापडला आहे. महिलेने सांगितले आहे की तीला शिंपले गोळा करण्याची सवय होती. ती एका बीचवर आपल्या नवऱ्यासोबत शिंपले गोळा करत होती त्यावेळी तिला हुबहुबी लादेनच्या चेहऱ्यासारखा शिंपला सापडला आहे.

 

शिंपला सापडल्यानंतर महिला अनेकवेळ आपल्या पतीसोबत हसत होती. डेब्रा ऑलीवर नावाची ही महिला आपला पती मार्टिनसोबत पश्चिम लंडनच्या ब्रेंटफोर्ड परिसरात राहते. बुधवारी लग्नाचा ४२ वा वाढदिवस असल्यामुळे ती आपल्या पती सोबत पूर्वेकडील समुद किनाऱ्यावर गेली होती त्यावेळी तीला तो शिंपला सापडला. त्यानंतर तिने नीट बारकाईने तो शिंपला पाहिला असता तीला तो लादेनच्या चेहऱ्याप्रमाणे वाटला.

यावेळी महिला अगदी मस्करीत म्हणाली की, लादेनला सुद्धा समुद्र किनारीच दफन केले गेले होते. तसेच चुकूनच असे होते की एखाद्या शिंपल्यात चेहरा दिसेल. या आधी असे कधीच झाले नसल्याचे तिने यावेळी सांगितले. तिच्या म्हणण्याप्रमाणे ती फिरत असलेल्या समुद्र किनाऱ्यावर अनेक शिंपले होते त्यात तिला हाच शिंपला भेटला. सुरुवातीला या शिंपल्याचा आकार तिला येशू सारखा वाटला. मात्र नंतर शिंपल्याच्या वरील पगडीसारखा भाग पाहताच तीला तो लादेनसारखा वाटला. ओसामा बिन लादेन हा अलकायद्याचा प्रमुख होता. ९/११ हल्ल्यानंतर अमेरिकेत लादेन हा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी होता.

 

Visit : Policenama.com