नारायण मुर्तिंचे जावई ऋषि सौनक यांना मिळू शकते इंग्लंडच्या अर्थ विभागात मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनचे उपवित्त मंत्री आणि इंफोसिसच्या सह संस्थापक नारायण मूर्तिचे जावई ऋषि सौनक यांना फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात वित्त विभागची मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. ब्रिटन कंजरवेटिव्ह पार्टीच्या एका वरिष्ठ सदस्याने संकेत दिले की एक नव्या इकोनॉमिक सुपर मिनिस्ट्रीला मोठी जबाबदारी मिळू शकते.

सौनक यांच्या कामाने प्रभावित आहेत जॉनसन –
एका वृत्तानुसार कंजरवेटिव्हच्या ट्रेजरी विभागाचे मुख्य सचिव सौनक यांची पदोन्नती करुन सीनिअर मिनिस्टर बनवले जाऊ शकते. एका वृत्तनुसार पंतप्रधान बोरिस जॉनसन एक नवे आणि मोठे उद्योग मंत्रालय बनवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. हे मंत्रालय आंतरराष्ट्रीय विभागाचे काम करेल. पीएमच्या एका कंजरवेटिव नेत्याने सांगितले की निवडणूकीदरम्यान सौनकच्या कामाने प्रभावित होऊन बोरिस जॉनसन यांना पदोन्नती देऊन मोठी जबाबदारी देऊ शकते.

2015 मध्ये रिचमंडमधून निवडून आले होते खासदार –
इंफोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्तींचे जावई सौनक यांच्याबाबत सांगितले जाते की बोरिस जॉनसन यांच्या त्यांच्यावर विश्वास आहे. सौनक ब्रेक्जिटचे समर्थक आहेत. ट्रेजरीचे मुख्य सचिव नियुक्त केले गेलेले सौनक 2015 मध्ये रिचमंडमधून खासदार म्हणून निवडण्यात आले आहे. पहिल्यांदा ते स्थानिक सरकारमध्ये जूनिअर मिनिस्टर होते. त्यांनी ऑक्सफोर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/