भारतानं परतवलं तर PAK मध्ये पोहचल्या इंग्लंडच्या खासदार, परराष्ट्र मंत्र्यांसह कार्यक्रमात होणार सहभागी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटिश खासदार डेबी अब्राहम यांना काही दिवसांपूर्वी दिल्ली विमानतळावरून परत पाठविण्यात आले होते, त्यावरून बराच वाद झाला होता. भारतात प्रवेश न मिळाल्याबद्दल त्यांनी भारत सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान, संबंधीत खासदार सध्या पाकिस्तान दौर्‍यावर असून, तेथे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांची भेट घेणार आहे. दोघेही पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे.

ब्रिटनच्या ऑल पार्टी पार्लमेंटरी ग्रुप ऑफ कश्मीरच्या अध्यक्षा आणि लेबर पार्टीच्या खासदार डेबी अब्राहम यांनी यापूर्वी ट्वीट करत आरोप केले होते कि, व्हिसा असूनही त्यांना भारतात प्रवेश देण्यात आला नव्हता आणि दिल्ली विमानतळावरूनच हद्दपार केले गेले. दरम्यान, सरकारकडून या आरोपांवर स्पष्टीकरणही देण्यात आले. यात म्हटले की, एखाद्याचा व्हिसा रद्द करणे सरकारच्याच हाती आहे आणि डेबी अब्राहम भारतविरोधी कार्यात सहभागी आहे.

भारतात प्रवेश न मिळाल्याने डेबी अब्राहम आता पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. येथे त्या पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांची भेट घेणार असून, या व्यतिरिक्त त्या पाकिस्तान अधिकृत काश्मीरलाही भेट देऊ शकते. यासाठी पाकिस्तानी अधिकारी तयारी करत आहेत. बुधवारी, त्या एका कार्यक्रमात हजेरी लावतील, ज्यात पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांव्यतिरिक्त इतरही खासदारांचा समावेश असेल. तसेच डेबी अब्राहम यांच्यासह ब्रिटनमधील इतरही अनेक खासदारांचा या गटात समावेश आहे.

ट्विटरवर भारताच्या विरोधात मोर्चा :
भारतात प्रवेश रोखण्यात आल्यांनतर डेबी अब्राहम यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका केली. काश्मीर प्रश्नावर टीकेमुळे त्यांना प्रवेश देण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. डेबी अब्राहम यांनी कलम ३७० हटवल्यानंतर लागू केलेल्या निर्बंधांविरोधात आवाज उठविला होता आणि भारत सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. डेबी अब्राहम यूके लेबर पार्टीच्या खासदार आहेत.