दुर्देवी ! आजोबांच्या पुण्यतिथीसाठी आलेल्या 2 बहिणींचा मृतदेह घराच्या छतावर सापडल्यानं प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या पंजाबमधील दौलत नगर येथील १७ आणि २४ वर्षांच्या दोन बहिणींचा बाथरूममध्ये गॅस गळतीमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही बहिणी ब्रिटीश नागरिक असून आपल्या आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्या पाकिस्तानात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, मारिया (24) आणि नादिया रहमान (17) अश्या या मृत बहिणींची नावे आहेत. दोघीही घराच्या मजल्यावर मृत अवस्थेत आढळल्या. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालाशी संबंधित माहितीदेखील अद्याप समोर आलेली नाही.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 12 जानेवारी रोजी झालेल्या या दोन्ही बहिणीच्या मृत्यूची बातमी आंतरराष्ट्रीय माध्यमात प्रसिद्ध झाली असल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर पाकिस्तानी माध्यमांनी सांगतले की, या मुलींच्या पालकांनी त्यांच्या मृत्यूला अपघात मानले असून कायदेशीर कारवाईचा विचारदेखील केला नाही. मुलींचे नातेवाईकदेखील या घटनेबद्दल बोलण्यावर टाळाटाळ करताना दिसत आहे. यानंतर या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा येऊ लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मारिया आणि नादियायांच्यासोबत ऑनर किलिंगचा प्रकार झाला असल्याचे म्हंटले जात आहे. परंतु या मुलींच्या सावत्र आईने हे आरोप फेटाळून लावत गॅस गळतीमुळे बहिणींचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –