गायिका ब्रिटनी स्पीयर्सच्या BIKINI YOGA ची सोशल मीडियावर ‘धुमाकूळ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत सर्व कलाकार आपल्या फिटनेसबाबतीत खूप चिंतेत असतात. ते त्यांच्या फिटनेसवर खूप लक्ष देत असतात. हॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध असलेली गायिका ब्रिटनी स्पीयर्सने फिटनेस रुटीनला पुन्हा सुरुवात केली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या फिटनेसचे व्हिडिओ शेअर केले आहे. ती नेहमी आपले सेक्सी फोटो व्हिडिओ शेअर करत असते. पुन्हा एकदा तिने बिकनीमध्ये योगा करत असल्याचे व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना घायाळ केले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/B61cx09ANlk/?utm_source=ig_embed

नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर लगेगच ब्रिटनीने आपल्या फिटनेससंदर्भात अधिक काळजी घेत असल्याचे दिसत आहे. ब्रिटनीने बिकनीवर योगा करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती जांभळ्या कलरची पोल्का डॉटेड बिकनी घालून वेगवेगळा योगा करत असल्याचे दिसत आहे. यासोबतच तिचे दोन मित्र म्हणजेच तिचे दोन कुत्रे सुद्धा तिच्यासोबत दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B2scIRSANfF/

व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या चाहत्यांना ब्रिटनीने सांगितले की, ‘आज मी माझ्या मित्रांसोबत म्हणजेच कुत्र्यांसोबत बाहेर आहे. आज मी छाती आणि कंबरेसाठी योगा करणार आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास असणार आहे.’ हे बोलल्यानंतर तिने योगा करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओला तिने कॅप्शनही दिले आहे. तिचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Be3h23Yllap/

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/