गाडीची काच फोडून किंमती एैवज लंपास

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन

हनुमंत चिकणे

जमीन मोजणी करण्यासाठी गेल्याचा फायदा उचलत चारचाकी गाडीची पाठीमागील दरवाज्याची काच फोडून लॅपटॉप व तिन तोळे वजणाचे सोन्याचे गंठण असा एकूण ६८ हजार दोनशे रुपयाचे साहित्य लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता.११) थेऊर (ता. हवेली) येथील ताम्हाणे वस्ती येथे घडली. याप्रकरणी सुभाष अनंत गाढवे (वय ४७, रा. गाढवे मळा, थेऊर फाटा, ता. हवेली) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6061912c-cd73-11e8-9914-6f9d814cf443′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष गाढवे जमीन मोजणीचे काम करतात तसेच त्यांच्या बरोबर राहुल भालचंद्र आगलावे (वय-२७ सध्या उरुळीकांचन मूळ रा. बावी,ता. बार्शी जि. सोलापूर) हे सहायक म्हणून काम करतात. हे दोघे (ता.१० ) रोजच्या प्रमाणे थेऊर फाटा येथील ताम्हाणे वस्ती, येथील दिलीप शिवाजी ऊंद्रे यांच्या जमीन मोजणीचे काम असल्याने गाढवे व आगलावे हे दोघे चारचाकी गाडी घेऊन आले होते. सकळी १० वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या करण ढाब्यासमोर असलेल्या एका झाडाखाली त्यांनी गाडी लावली. व गाडीमध्ये मागील शीटवर लॅपटॉप व आगलावे यांच्या बॅगमध्ये जेवणाचा डबा व त्यांचे पत्नीचे तीन तोळे वजणाचे सोन्याचे गंठण होते.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’661056c6-cd73-11e8-93b1-15c8516d5d59′]

गाडी बंद करून मोजणीसाठी गेले असता मोजणी संपवून आल्यानंतर पाहिले असता गाडीची पाठीमागील काच तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. गाडीच्या आत पाहणी केली असता, गाडीमधील लॅपटॉप व आगलावे यांचा जेवणाचा डबा व सोन्याचे गंठण ठेवलेली पिशवी आढळून आली नाही. यानुसार ६८ हजार दोनशे रुपयाचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री पटली. याप्रकरणी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करीत आहेत.