‘Facebook’ च्या नात्याला मायेची ‘झालर’ ! मानलेल्या भाऊ-बहिणीची 4 वर्षानंतर भेट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मानवी संबंध, खरं तर साहित्याचा केंद्रबिदू आहे. “संबंधातुन अस्तित्व निर्माण होते “मानवी अस्तित्वाची खूणगाठ आहेत, काही संबंध आपण जन्मा बरोबर घेऊन येतो. आई, वडील, काका, मामा, बहीण, भाऊ हे निवडण्याचे स्वातंत्र नसतं. नाते काही रक्ताचं, तर काही मानलेल. मानलेल्या नात्यांना आपल्या नातेवाईकांचा दर्जा देण खरोखर कौतुकास्पद आहे. धावपळी च्या जीवनात स्वतः ला सांभाळून आपले नातेवाईक सांभाळण, तारेवरची कसरत.

नातेसंबंध टिकवणं आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी सतत सावध रहावं लागत. लहानपणी एका ताटात जेवणारी भावंड मोठेपणी एकमेकांच तोंड पहात नाही, असे अनेक कुटूंब आपण पहातो. एकमेकांनबद्दल ची तीव्रता कोठे आटते? अशा संघर्षातुन आनंदाचे क्षण विसकटुन जातात. रक्ताची नाती म्हध्येच सोडता येत नाही, त्यामुळे अस्वथता वाढते. एकाच वेळी प्रेम आणि द्वेष यांचं द्वंद्व सुरु होत. परिणाम क्रयशक्ती, नवनिर्माण शक्ती क्षीण होत जातात, एकटे पणा ची भीती वाटते.

अशा वातावरणात एक अनोख नातं निर्माण झालंय आणि ते ही फेसबुक वरून !…. श्री. ज्ञानेश्वर जाधव देशमुख आणि पंढरपूर जवळ माळशिरस च्या सौ.धनश्री कदम ताई. फेसबुक संवादाचं नवीन माध्यम पण तितकच अविश्वासू ! ह्या माध्यमातुन मैत्री होण्याच प्रमाण ही वाढलंय, मात्र ह्या नात्यात न अडकलेलं बरं असंचं म्हटलं जातं. पण आपल्या ज्ञानेश्वर दादा व ताई ने एकमेकांबद्दल च्या भावना सांगितल्या. भावनांची कदर केली. आज हे नातं सदृढ, निरोगी, दीर्घायुष्यी झालेलं आहे. खरं तर एक स्त्री आणि पुरुष यांचं नातं आपल्या समाजात अजूनही पोषक नाही. पण ज्ञानेश्वर दादा आणि धनश्री ताई ने दाखवून दिलं की निर्मळ, निस्वार्थी नातं काय असतं. सर्वच नाती रक्ताची नसतात.

तस हे नातं मनानी जुळलेलं, यात ज्ञानेश्वर दादा आणि ताई या रत्नाचा समावेश, भावाचं निरागस प्रेम, बहिणीची अफाट माया. हे सर्वांच्या भाग्योदयी नसतं.ज्या दादाला कधीच बहिणीचं प्रेम मिळालं नाही, अशा वळणावर बहिणीची भेट झाली. ज्ञानेश्वरदादा ला सक्खी बहीण नाही, ताई चा भाऊ 20 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याआड गेला. ताईला नेहमी वाटायचं.

“एक तरी भाऊ असावा
सक्खा जरी नसला…
तरी सक्ख्याहुन अधिक
जवळचा भासावा…..
एक तरी भाऊ असावा
नातं रक्ताचं नसलं….
तरी हृदयी जुळलेला असावा
एक तरी भाऊ असावा….
कोणी साथ देत नसेल तर….
तो पाठीशी असावा…
एक तरी भाऊ असावा….
माझ्या बरोबर नसला तरी
त्याच्या शुभेच्छा पाठीशी
असाव्यात….
आणि ताईची इच्छा पूर्ण झाली. किती समजूतदार, परोपकारी, स्वच्छ मनाचा भाऊ, ताईला मिळाला. गेली चार वर्ष ताई -दादा एकमेकांना मेसेज पाठवत होते.

ज्ञानेश्वर दादा मराठा महासंघ व उत्तम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, नवीन विचारांचे, प्रगतीशील समाज, नवीन पिढी ला घडवण्यासाठी कायम तत्पर आणि अनेक सामाजिक काम करणारे. सौ. धनश्री ताई व ज्ञानेश्वर दादा यांच्या परिवाराला ही हे नातं खुप भावलं. चार वर्षानंतर दिवाळीच्या सुट्टीत ज्ञानेश्वर दादा सहपरिवार श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले. सौ. धनश्री ताईचा खुप आग्रह होता, की दादा घरी आलं पाहिजे, भेटलं पाहिजे.ज्याला भाऊ मानलं, रक्षाबंधन ला चार वर्षापासून राखी पाठवतो तो दादा आहे तरी कसा !….

दादाला घरी आमंत्रण दिलं, स्वतः च्या खर्चानी पंढरपूर ला रूम, जेवण व दर्शनाची व्यवस्था केली. पूर्वी जन्मी चे हे बहीण – भाऊ, विठू माऊली च्या दारात, माऊली ची ही लेकर भेटली. किती आनंदाचा हा क्षण ! सर्व परिवार भारावून गेला. ताईच्या मनाची अवस्था तर काय सांगावी ! प्रेम, माया, जिव्हाळा या अलंकारा नी नटलेली ताई, तिच्या डोळ्यातून चंद्रभागा वाहतेय ! तर स्वार्थ, द्वेष, मत्सर हे विकार नसलेला ज्ञानु दादा अबोलपणे आपल्या भावना जपत होता.
“पंढरपूर च्या वाटे
भाऊ बहिणीला भेटला
वळवा चा पाऊस
ढग आस्मानी फुटला….

खरं मानलेली नाती रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळी असतात.
त्याचठिकाणी ओवाळण्याचा कार्यक्रम झाला. चार वर्षापासून न पाहिलेल्या भावाला, न चुकता राखी पाठवणारी ताई आज ओवाळत होती.

जगभरात प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस उत्साहाने साजरे होताना आपण पहातो. पण ज्या दिवशी हे बहीण – भाऊ भेटले, तो दिवस म्हणजे त्यान्च्या आयुष्यातील प्रेमाच्या नात्याची ही पोकळी भरून निघाली. इतकं निरपेक्ष…., निष्पाप…., आणि निरागस….. नातं क्वचित बघायला मिळेल ! धनश्री ताई ने दादा ला श्री विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती भेट दिली. अशी हक्काची जीव लावणारी बहीण ताईच्या रूपाने मिळाली. ह्या नात्यामुळे ज्ञानेश्वर दादा च्या हसऱ्या चेहऱ्यावरचं हास्य अजूनच गडद झालंय. दोन्ही परिवाराचा आनंद द्विगुणित झालाय. दादा पासून प्रेरणा घेऊ, संकल्प करू, माणसं जोडण एक कला आहे. आणि त्यातील ओलावा टिकवून ठेवणं देखील !

आयुष्यभर साथ देऊ असं सांगून जड अंतःकरणाने भावा -बहिणी ने एकमेकांचा निरोप घेतला. आजीवन स्मृती जपण्यासाठी…. !
अशी सुखद स्पर्श देणारी कहाणी !, आणि कर्माने मिळालेलं, कधी न तुटणारं ताई -दादा चं नातं….. !
हीच खरी जीवनातील समृद्धी च्या धागादोऱ्याची गाठ…. !
हेच खरं जीवनातल समर्पण…. !
किती साधं सरळ आहे ना?
बहीण – भावाचं हे नातं
जिथे काही न बोलताचं
सर्व समजलं जातं
नशिबवान लोकांनाच
रक्ताबाहेरचं मिळतं नातं
मनापासून निभावलं तर…….
बहीण – भावाच्या प्रेमा पुढे
मोठं काय असतं……. !

Visit : Policenama.com