भावानेच केले बहिणीवर कोयत्याने सपासप वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – आईशी हुज्जत घातल्याची विचारणा केली म्हणून भावाने बहिणीवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना निगडी, ओटास्किम येथे घडली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या भावाला अटक केली आहे.

दिलदार उर्फ नसरुद्दीन शबू खान (२६, रा. दळवीनगर, ओटास्किम निगडी) असे अटक झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी करिष्मा शबू खान (२१, रा. दळवीनगर, ओटास्किम निगडी) हिने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास करिष्मा, त्यांच्या आई शमा, बहीण निशा आणि आरोपी भाऊ असे चौघेजण बोलत होते. त्यावेळी दिलदार याने आईला शिवीगाळ केली. त्यामुळे करिष्मा यांनी त्याला शिव्या देण्याचा जाब विचारला. यावरून चिडलेल्या दिलदार याने करिष्मा यांनाही शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने पायावर वार केले. दिलदार याने करिष्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच बहीण निशा यांनाही मारहाण केली. तपास निगडी पोलीस करीत आहेत.

टोळक्याचा हॉटेल मध्ये राडा

मित्रांसोबत गप्पा मारत असताना आलेल्या टोळक्याने हॉटेल मधील खुर्ची डोक्यात मारून तरुणाला जखमी केले. तसेच हॉटेमध्ये दंगा घालत एकावर कोत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेसातच्या सुमारास हॉटेल चावडी येथे घडली.

या प्रकरणी प्रितम सुरेश हजारे (२९, रा. चिंचवड) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर अमर कसबे (२५, रा. निगडी), अमर उघडे (२५) व त्यांचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम व त्यांचा मित्र अमोल अहिरे हे दोघेजण हॉटेल चावडी येथे बोलत उभे होते. त्यावेळी आरोपींनी जमाव जमवून हॉटेल मालक व कामगारांना शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. फिर्यादी व आरोपी अमर यांच्यातही वादाला सुरुवात झाली. यावेळी अमर याने लोखंडी खुर्ची फिर्यादीच्या डोक्‍यात मारली व कसबे याने त्याच्या हातातील कोयता हजारे यांच्या डोक्‍यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

पुणे \ पिंपरी : कोकणे चौकात सराफावर भरदिवसा गोळीबार  

Loading...
You might also like