बहिणीला आणण्यासाठी गेलेल्या भावाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कामावरून आलेल्या बहिणीला घरी आणण्यासाठी जाणाऱ्या भावाच्या दुचाकीला कंटनेनरने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना चाकण तळेगाव रोडवर गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. घटनेनंतर मात्र कंटेनरचालक पसार झाला.

प्रतिक विजय ढोरे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रतिकची बहिणी कामावरून तळेगाव येथे आली होती. तिला आणण्यासाठी तो चाकण तळेगाव रस्त्याने तळेगाव रेल्वे स्थानकाच्या दिशेने दुचाकीवरून गुरुवारी सायंकाळी दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी प्रतिकच्या दुचाकीला कंटेनरने समोरून धडक दिली. यात प्रतिक गंभीर जखमी झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रतिकला तेथील नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. प्रतिक इयत्ता बारावीत शिकत होता. या घटनेमुळे ढोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.