धक्कादायक ! 100 रुपयांच्या ‘ड्रेस’ खरेदीवरुन भावाने काढले बहिणीचे ‘डोळे’ बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अल्पवयीन तरुणाने बहिणीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १०० रुपयांचा ड्रेस खरेदी केला या क्षुल्लक कारणावरुन तरुणाने बहिणीवर अमानुष मारहाण केली. एवढ्यावर न भागता या तरुणाने रागाच्या भरात बहिनीचे डोळे बाहेर काढले. या प्रकारानंंतर दिल्ली महिला आयोगाने ही माहिती दिली आहे. मुळचे बिहारचे असलेले हे कुटूंब नवी दिल्लीत राहते, तेथे ही धक्कादायक घटना घडली.

दिल्ली महिला आयोगाचे सदस्य प्रत्येक घरात जाऊन भेट घेत होत्या, यावेळी महिला आयोगाच्या महिला सदस्यानी एक मुलीची जोराजोरात रडण्याचा आवाज ऐकला. त्यांनी शेजारी चौकशी केली असता स्पष्ट झाले की, तरुण नेहमी आपल्या बहिणींना मारहाण करत असतो.

या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंंतर महिला आयोग्याच्या सदस्यांनी कार्यालयात फोन लावून तरुणाच्या घरी पोहल्या. यावेळी तरुणाने त्यांच्याशी असभ्य वर्तन करत त्यांच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी घरात प्रवेश मिळवला. यावेळी मुलगी घरात जमिनीवर पडली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तरुणाने मारहाण केल्याने तरुणीच्या तोंडावर जखमा झाल्या होत्या आणि तिच्या जखमातून रक्त वाहत होते.

पीडित मुलीला सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. पण या प्रकाराने तरुणाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पीडित तरुणीच्या भावाने तिला घरात डांबून ठेवले होते आणि कोणतीही वैद्यकीय मदत मिळू दिली नव्हती.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like