वासनेपोटी दिरानेच केला सख्या वहिनीवर बलात्कार

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन

या जगामध्ये वासनेपोटी पशूलाही लाजवेल असे कृत्य मनुष्य प्राणी करत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आपल्या हवसेपुढे त्याला नाते, गोते याचे भानच राहत नाही हे विविध घटनांमधून समोर येत आहे. असाच एक मानवतेला आणि नात्यांना काळिमा फासणारा प्रकार दौंड तालुक्यातील पाटस येथे घडला असून वासनेपोटी आपल्या सख्ख्या वहिणीवरच नराधम दिराने बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे.
[amazon_link asins=’B079YNQQZ9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fadb28c0-8ceb-11e8-927f-3fc32bebea82′]

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी  दिराने एप्रिल २०१८ ते २० जुलै २०१८ या कालावधीमध्ये नात्याने सख्खी वहिनी असलेल्या पीडित महिलेला तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने बलात्कार केला. सुरुवातीला एप्रिल महिन्यात पीडित महिला हि घरात एकटी असताना नराधम दिराने तिला तू मला आवडतेस मी तुला माझ्या भावापेक्षा जास्त सुखी ठेवेन असे म्हणत तिच्यावर घरातच बलात्कार केला.

यानंतर जर तू कुणाला याबाबत काही सांगितलेस तर तुझी मुले मी मारून टाकीन अशी धमकी दिली यानंतर आरोपीने वेळोवेळी पीडितेला तिच्या  मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या देत बलात्कार केले. पीडित महिला काही कामानिमित्त एका गावात आली असता आरोपी दिराने तिला एका ट्रकमध्ये बळजबरीने बसवून  अहमदनगर येथील राशीन येथील एका भाड्याच्या खोलीत नेऊन वेळोवेळी बलात्कार करत राहिला.
[amazon_link asins=’B06XHM2MJ3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0db22823-8cec-11e8-b160-7569a674bbf1′]

हा सर्व प्रकार असह्य झाल्याने पिडीत महिलेने आपल्या नराधम दिराविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल होताच  नराधम दिर फरार झाला असून त्याच्यावर यवत पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३७६,३६३,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवतचे पोलीस उपनिरीक्षक लकडे करीत आहेत.