‘माझ्यात अन् भावात काय फरक’, दीरानं बलात्कार केल्यानंतर पती बोलला पत्नीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सासरी सासू, सासरे, नणंद आणि पतीच्या मारहाणीने, अत्याचाराने कंटाळलेली महिला जीव मुठीत धरुन सासरी जीवन जगण्याचा प्रयत्न करत होती. परंतू तिला कुठे माहीत होतं की तिच्या आयुष्याचा भ्रमनिरास होईल. तिच्याच घरात राहणाऱ्या तिच्या दीराची त्याचवर वाईट नजर होती याची तिला कल्पना ही नव्हती. एक दिवस संधीचा फायदा घेत दीराने तिच्यावर अत्याचार केले.

महिलेने ही घटना जेव्हा तिच्या पतीला सांगितले तेव्हा त्याने तिलाच सुनवण्यास सुरुवात केली आणि सांगितले की माझ्यात आणि माझ्या भावात काय फरक आहे?

महिलेला केली मारहाण –

महिलेने या विरोधात आवाज उठवला तेव्हा तिला क्रुरपणे मारहाण करण्यात आली. घरातून बाहेर काढण्यात आले. लाचार महिला तिच्या माहेरी निघून गेली आणि काही दिवस माहेरच्यांना ही घटना सांगितली नाही. त्यानंतर एक दिवस हिंमतीने महिलेने जैतपूरच्या पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.

पीडित महिलेने 9 नोव्हेंबरला लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच मागणी केली होती की आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, परंतू कारवाई तर लांबच राहिली, 10 दिवस निघून गेले परंतू अजूनही एफआयआर देखील दाखल करुन घेण्यात आली नाही.

Visit : Policenama.com