धक्कादायक ! मित्राच्या मदतीने भावानेच केला सख्ख्या बहिणीचा खून, बीड जिल्ह्यातील घटना

केज : पोलीसनामा ऑनलाइन – सख्‍ख्‍या भावानेच मित्राच्या मदतीने तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून बहिणीचा खून केला आहे. केज तालुक्यातील बोरगाव येथे बुधवारी (दि. 21) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शितल लक्ष्मण चौधरी (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दिनकर उर्फ दिन गोरख गव्हाणे आणि त्याचा मित्र दिनकर धनंजय वळेकर याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मयत महिलेचा चुलत भाऊ नानासाहेब जालिंदर गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे.

केज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल चौधरी यांचा तिचा भाऊ दिनकर गव्हाणे आणि त्याचा मित्र दिनकर वळेकर या दोघांनी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून खून केला. या प्रकरणी नानासाहेब गव्हाणे याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन तपास करत आहेत.