Post_Banner_Top

संतापजनक ! ५ वर्षांच्या मुलीवर आतेभावाकडून अत्याचार

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन – काहीतरी सांगायचंय असं म्हणत आतेभावाने ५ वर्षीय मामाच्या मुलीवर घराच्या जीन्याखाली लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे समोर आला आहे.

याप्रकरणी कुटुंबियांनी नारपोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत ५ वर्षीय मुलीला संबंधित आतेभावाने काहीतरी सांगायचे आहे अशी बतावणी केली. त्यानंतर तिला इमारतीच्या जीन्याखाली नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तर या प्रकाराबाबत कोणालाही काही न सांगण्याची धमकी देऊन त्याने पोबारा केला. दरम्यान मुलीला वेदना सुरु झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाच्या आईचीही चौकशी केली जाणार आहे.

Loading...
You might also like