बहिणीला वाचवण्यासाठी भावालाच ‘कस्टमर’ म्हणून जावे लागले ‘त्या’ अड्डयावर, पुढं झालं ‘असं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांगल्या नोकरीचे अमिश दाखवून एका व्यक्तीने एका मुलीला चक्क दिल्लीच्या देहविक्री व्यापार चालणाऱ्या कोठ्यावर विकले, या ठिकाणी त्या मुलीवर देहविक्रीसाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिल्लीच्या जीबी रोडवरील ही घटना आहे, त्या मुलीच्या भावाला हि गोष्ट समजताच तो स्वतः त्या मुलीचा ग्राहक म्हणून आला आणि याची तक्रार महिला आयोगाकडे केले. महिला आयोगाला ही गोष्ट समजताच आयोगाने तात्काळ पोलिसांच्या मदतीने कारवाई करत हा व्यापार चालवणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले.

मुळात पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेली ही युवती एका प्रसिद्ध कंपनीमध्ये नेटवर्किंग बिजनेस करत होती. जास्त पैशाच्या नोकरीच्या आमिषाने या युतीला एक व्यक्ती दिल्लीला घेऊन आला. ८ ऑगस्ट रोजी तीच्या भावाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर महिला आयोग आणि कमला मार्केटच्या पोलिसांनी मिळून छापा टाकत हा व्यवसाय चालवणाऱ्यांना ताब्यात घेतले.

भावाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याच्या बहिणीचा फोन दिल्ली येथे बंद झाला, खूप शोध घेऊनही बहिणीचा तपास लागत नव्हता अचानक त्याला एका व्यक्तीचा फोन आला आणि त्या व्यक्तीने तुझी बहीण दिल्लीतील जीबी रोडवरील एका कोठ्यावरती आहे असे सांगितले त्यावर भावाने तात्काळ दिल्लीला येऊन महिला आयोग आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपल्या बहिणीची सुटका केली.

आरोग्यविषयक वृत्त