दुर्देवी ! भावाने केलं बहिणीचं तब्बल 100 वेळा ‘लैंगिक’ शोषण अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील सेंट चार्लेस, मिसुरी येथे १७ वर्षाच्या भावाने आपल्या ११ वर्षीय बहिणीचा लैगिंक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. ११ वर्षाच्या पीडितेने घराच्या बाथटबमध्ये प्रिमॅच्युअर बाळाला जन्म दिला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याच्या आरोपात भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आई-वडील ११ फेब्रुवारीला एका नवजात बालकाला घेऊन मिसुरच्या सेंट जोसेफ हॉस्पिटलमध्ये आले. तेव्हा त्यांनी त्याचा मुलगा आहे, वडिलांच्या एक्स गर्लफ्रेंडने हा मुलगा त्यांच्या घराच्या बाहेर सोडून दिला आहे. असं खोट सांगितले. नंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्यानी सांगितले त्याच्या मुलीचे हे बाळ आहे. तसेच त्यांचा मुलगा हा त्या बाळाचे वडील आहेत.

पोलिसांनी आरोपी मुलाची चोकशी केली तेव्हा त्याने बहिणीचा १०० वेळा लैंगिक छळ केला असं सांगितलं. मुलगी गरोदर आहे तसेच भाऊ तिच्यावर बलात्कार करत होता या गोष्टीची माहिती आईवडिलांना नव्हती. बाळ हे प्रिमॅच्युअर आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. ही दोन्ही मुलं नातेवाईकाकडे राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. नंतर त्यांना तुरंगात पाठवले आहे. महिलेला १० हजार डॉलर, पुरुषाला १ लाख डॉलर, आणि अल्पवयीन मुलास ३ लाख डॉलरच्या जामिनावर सोडण्यात आले आहे. अशी माहिती एनबीसी न्यूजने दिली आहे.

You might also like