सख्या भावाने घातला डोक्यात दगड ; जागेच्या कारणावरुन उठला जीवावर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जागेच्या कारणावरुन असलेल्या वादात सख्या भावाने डोक्यात दगड घालून आपल्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे गावात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दत्तात्रेय वामन पाडाळे, कुंदा दत्तात्रेय पाडाळे, तन्मय दत्तात्रेय पाडाळे, सायली दत्तात्रेय पाडाळे, दिगंबर जगन्नाथ पिंपळे (रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या घटनेत रखमाजी वामन पाडाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी योगेश रखमाजी पाडाळे (वय २५, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. रखमाजी आणि दत्तात्रेय पाडाळे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यात जागेच्या कारणावरुन वाद आहे. योगेश यांनी त्यांच्या स्वत:च्या घरासमोरील दगड, मुरुम असा राडारोडा कामगारांकडून काढून तो समोरच्या अमोल मोहोळ यांच्या जागेत टाकत होते. हा राडारोडा टाकायला अमोल मोहोळ यांनी संमती दिली होती. असे असताना दत्तात्रेय पाडाळे यांच्या घरातील सर्व जण आले व त्यांनी योगेश यांचे वडिल व दत्तात्रेय यांचे सख्खे भाऊ रखमाजी, योगेश व त्यांची आई यांना लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात दत्तात्रेय याने रखमाजी यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला. या भांडणात योगेश यांच्या आईचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

Loading...
You might also like