बहिणीचं ‘सुत’ जुळल्याचं समजताच ‘पारा’ चढला भावाचा, मित्रासह कट रचून ‘काटा’ काढला युवकाचा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकमध्ये सैराटची पुनरावृत्ती झाली. बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणाने भावाने मित्र्यांच्या सहाय्याने बहिणीच्या प्रियकराची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये डिंगरअळी, संभाजी चौक परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली. विवेक शिंदे (वय,23 वर्ष) असे तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ रोहन शिंदे याने भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सुशांत वाबळे, शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव अशी फरार आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

काय घडला प्रकार –

विवेक सुरेश शिंदे हा तरुण आपला मित्र ओम राजेंद्र हादगे बरोबर भीशीची रक्कम गोळा करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी घराबाहेर निघाला होता. रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान तो दुचाकीवरुन जुन्या नाशिकमार्गे घराच्या दिशेने जात असताना संशयित आरोपी सुशांत वाबळे, शंभू जाधव यांच्यासह दोन जणांनी त्याला रस्त्यात अडवले. यावेळी ओम हादगे यांनी रोहन शिंदे यांस फोन करुन सुशांत वाबळे याने आपला रस्ता अडवल्याची माहिती दिली. विवेकने त्यांच्याकडून सुटका करुन घेतली, परंतू त्यानंतर संभाजी चौकाजवळील उर्दू शाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेत त्याला गाठण्यात आले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले.

विवेक गंभीर जखमी झाला होता त्यामुळे त्याला उपचारासाठी रोहनेने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याला रोहनने जिल्हा रुग्णालयात हलवले. परंतू रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजनकुमार सोनवणे पुढील तपास करत आहेत.

बहिणीसोबत तीन वर्षांपूर्वी होते प्रेमसंबंध –

विवेकचे शंभू जाधवच्या बहिणीसोबत तीन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. विवेकचा शंभूच्या बहिणीसोबत केटीएचएम कॉलेजसमोर जूनमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याप्रकरणी शंभूच्या आईवडिलांनी विवेकच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिंदे आणि जाधव कुटूंबात समझोता झाला. तेव्हापासूनच शंभूला विवेकबद्दल राग होता असे रोहन शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like