धक्कादायक ! सख्खे भाऊ पक्के वैरी, सख्ख्या भावाचा बेदम मारहाण करून खून

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या मालकिच्या झाडावरील आंबे तोडल्याच्या रागातून सख्ख्या भावाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून केल्याची घटना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पालसईत येथे बुधवारी घडली.

दिलीप पाटील असे खून झालेल्याचे नाव आहे. तर त्याचा सख्खा भाऊ जयवंत पाटील व पत्नी जयश्री जयवंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना ?

वाडा तालुक्यातील पलसईत येथे दिलीप पाटील यांच्या घराच्या पाठीमागे आंब्याचे झाड आहे. या झाडाचे आंबे दिलीप पाटील यांनी पाडले. त्याचा राग मनात धरून त्यांचा सख्खा भाऊ जयवंत पाटील याने जाब विचारत हातातील दांडक्याने त्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर दिलीप पाटील हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मुंबईला उपचारासाठी नेण्यास सांगितले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वाडा पोलिसांनी जयवंत पाटील आणि त्याची पत्नी जयश्री जयवंत पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे अधिक तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like