Brown Rice Benefits | व्हाईट राईसऐवजी का खावा ब्राऊन राईस? डायबिटीजमध्ये सुद्धा लाभदायक; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Brown Rice Benefits | तांदळात (Rice) भरपूर पोषकतत्व असतात जी शरीरासाठी आवश्यक मानली जातात. नेहमी यावरून लोक द्विधा मनस्थितीत असतात की, व्हाईट राईस आणि ब्राऊन राईसमध्ये कोणता जास्त चांगला आहे. न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगी (Nutritionist Bhuvan Rastogi) यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ब्राऊन राईससंबंधी अनेक आश्चर्यकारक तथ्य शेयर केली आहेत आणि सांगितले आहे की, डेली डाएटमध्ये याचा समावेश करण्याचे काय फायदे आहेत. (Brown Rice Benefits)

 

न्यूट्रिशनिस्ट भुवन यांनी लिहिले आहे की, सर्व व्हाईट राईस पॉलिश करण्यापूर्वी ब्राऊनच असतो. पॉलिश न केलेले तांदूळच ब्राऊन राईस नावाने विकले जातात. ब्राऊन राईस संपूर्ण धान्य असते तर व्हाईट राईस प्रोसेस्ड असतो.

 

 

जेव्हा तांदळाचे दाणे पॉलिश केले जातात, तेव्हा याच्यातून कोंडा आणि कोंबाचा भाग काढला जातो. तांदळाच्या कोंबाच्या भागात भरपूर मिनरल आणि कोंड्यात भरपूर फायबर असते. पॉलिशनंतर व्हाईट राईसमधून फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स (fiber vitamins and minerals) काढले जातात. (Brown Rice Benefits)

न्यूट्रिशनिस्टने काय सांगितले

सफेद तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स 70 पेक्षा जास्त आणि ब्राऊन राईसचा जवळपास 50 आहे.

व्हाईट राईसच्या तुलनेत ब्राऊन राईस ब्लड ग्लुकोजचा स्तर जास्त वाढवत नाही. हा मधुमेहाच्या रूग्णांसाठी चांगला पर्याय आहे.

सफेद तांदळात फायबरची मात्रा खुप कमी असते.

आहारात अशा कोणत्याही गोष्टीचा समावेश नको, ज्यामध्ये केवळ कॅलरी असेल आणि कोणतेही पोषकतत्व नसतील.

1900 च्या दशकाच्या सुरूवातीला बेरीबेरी आजार ब्राऊन राईसच्या तुलनेत खुप जास्त व्हाईट राईस खाण्याने मोठ्या प्रमाणात पसरला होता. कारण यामुळे लोकांमध्ये व्हिटॅमिन बी1 ची कमतरता निर्माण झाली होती.

 

Web Title :- Brown Rice Benefits | brown rice or white rice which is better for your health nutrition benefits side effects

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Corporator Pramod Bhangire | प्रमोद भानगिरेंनी स्वखर्चाने केलेल्या प्रभाग 26 मधील विकासकामाचे उद्घाटन; शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले – ‘शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतर नगरसेवकांपेक्षा अधिक सरस’

Prashant Jagtap | छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची; प्रशांत जगताप यांची टीका

Maharashtra Police-CID | ICJS मधील ‘पोलीस सर्च’ वर्गवारीत देशपातळीवर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक; CID मधील PSI अर्चना कदम, पोलिस अंमलदार संदीप शिंदे, प्रियंका शितोळे यांचा गौरव