अवैध दारुविक्री धंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकासह 2 पोलिसांवर प्राणघातक हल्ला, प्रचंड खळबळ

सोलापूरः पोलीसनामा ऑनलाइन – अवैध दारु विक्री (Illegal sale of liquor) धंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या वेळापूर (ता. माळशिरस)  पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह दोघा पोलिसांवर  पारधी वस्ती येथील 50 ते 60 लोकांनी प्राणघातक हल्ला केला आहे. यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि. 28)  ही घटना घडली.  या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चालू होते.

पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके यांच्यासह पोलीस नाईक दीपक मेहरकर असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, वेळापूर येथील पारधी वस्ती या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरु असल्याची माहिती वेळापूर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्यासह इतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत पारधी  समाजामधील घरांमध्ये जाऊन दारू नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी अवैद्य धंदा करणारे पारधी लोकांनी एकत्रित येऊन पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला.  वेळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी यापूर्वी वेळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैद्य दारु विक्री करणा-यावर कारवाई केली आहे.  टनेची माहिती मिळताच अकलुज उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरु यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली.

Also Read This : 

29 मे राशीफळ : आज शुभयोग, ‘या’ 5 राशींना मिळणार यश, सहज होतील कामे, इतरांसाठी असा आहे शनिवार

कोरोनाला हरवण्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधला नवा उपाय, आता ‘ही’ स्वस्त अन् मस्त उपचार पध्दती वापरणार

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

 

#YogaDay2019 : योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता