पिंपरीत दोन गटात तुफान ‘राडा’ ; कोयत्याने सपासप वार, ५ जखमी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – बौद्धनगर पिंपरी येथे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास भांडणाच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अमोल बबन घोडके आणि सुभाष बाजीराव तुरुकमारे या दोघांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.

अमोल बबन घोडके (30) याने दिलेल्या फिर्याद नुसार किशोर तुरुकमारे, सुभाष तुरुकमारे, पंडित तुरुकमारे, आनंद तुरुकमारे, सनी सोनवणे, राकेश साळवे, आकाश राजपूत, सनी सरवदे यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुभाष बाजीराव तुरुकमारे (28) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश बबन घोडके, बंटी भूमकर, सागर प्रभाकर शिंदे, प्रमोद दत्तात्रय साबळे, ऋषिकेश गीताराम तुरुकमारे, लखन उर्फ अमोल बबन घोडके व इतर तीन जण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल याने दिलेल्या फिर्यादीत सर्वजण आरोपी मिळून पहाटे दीडच्या सुमारास अमोलच्या भावाला मारहाण करीत होते. त्यामुळे ती भांडणे सोडवण्यास अमोल गेला असता त्याच्यावर जीवघेणा हल्ला करत कोयत्याने वार केले. यामध्ये अमोलच्या हाताला डोक्याला व भावाच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर इजा झाली.

सुभाषने दिलेल्या फिर्यादीनुसार, आकाश याने सुभाष याच्या समोर येऊन बिअरच्या बाटल्या फोडल्या. याबाबत सुभाषने विचारणा केली असता ‘तू काय भाई आहेस का, तू मला विचारणार कोण’ असे म्हणत आकाशने सुभाषवर कोयत्याने वार केले. तसेच अन्य आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये सुभाष, त्याचा भाऊ आणि मित्र असे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे