संतापजनक ! दोन बहिणी आणि मामीवर सामुहिक बलात्कार, विरोध केल्यानंतर छातीत घातली गोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमधील सुपौल जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी दोन बहिणी यात्रेला जात असताना त्यांच्यावर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या मामीवर देखील नराधमांनी बलात्कार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन बहिणी आपल्या मामीसह आणि दोन पुरुष नातेवाईकांसह यात्रा पाहायला निघाल्या होत्या. मात्र एका सामसूम ठिकाणी दबा धरून बसलेल्या सहा नराधमांनी या दोन पुरुषांना बंदी बनवत दोन बहिणींवर आणि त्यांच्या मामीवर सामूहिक बलात्कार केला. मात्र मोठ्या बहिणीने याला विरोध केला असता तिला गोळी मारून जखमी करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 8 वाजता हि घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.पोलिसांनी घटनेत जखमी झालेल्या मुलीला दवाखान्यात भरती केले असता तिचा पटना येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवला असून तपास सुरु केला आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची आणि कडक शिक्षा देण्याची मागणी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत.

Visit : Policenama.com