उस्मानाबाद : कळंबमध्ये वॉचमनचा गोळ्या झाडून खून, परिसरात प्रचंड खळबळ

कळंब  :पोलीसनामा ऑनलाइन –  कळंब शहरातील (kalamb city) मार्केट यार्डमध्ये अजय जाधव यांच्या आडतीवर काम करणाऱ्या वॉचमनचा गोळ्या झाडून खून  केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळंब शहराच्या (kalamb city) मध्यवर्ती भागात खूनाची घटना घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मच्छिंद्र छगन माने (अंदाजे वय-40 रा. फरिदनगर, डिकसळ भाग) असे खून झालेल्या वॉचमनचे नाव आहे.

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

मध्यरात्री घडली घटना

अजय साहेबराव जाधव यांच्या आडतीमध्ये मानेसह पाच ते सहा जण हमालीचे काम करतात.
माने हा जाधव यांच्या आडतीवर हमालीसह वॉचमन म्हणून काम करत होता.
अजय जाधव यांच्या अडतीच्या बाहेरच्या परिसरात माने झोपला होता.
अचानक एकजण भिंतीवरून उडी मारून आला आणि त्याने मानेला मारहाण करायला सुरुवात केली.
दोघांमध्ये झटापटी झाली आणि आणि नंतर माने खाली पडले.

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट, शेअर केला ‘हा’ फोटो

सीसीटीव्हीत घटना कैद

सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार पाहणाऱ्या मालकांनी सांगितले की, झटापटीत स्पार्क झाल्याचे दिसते त्यानंतर माने खाली पडले.
त्यामुळे माने यांना गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडल्याची शक्यता वर्तवली जातेय.
माने यांच्या पोटावर आणि छातीवर जखमेचे व्रण दिसत आहेत.

UP मधील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण बीडमधील मृतदेहांच्या विटंबनेची चर्चा होत नाही – देवेंद्र फडणवीस

घटनास्थळी श्वान पथक दाखल

या घटनेची माहिती मिळताच आजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.
खूनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या

पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी

दरम्यान शहरातील मध्यवर्ती भागात खूनाची घटना घडल्याने अतरिक्त पोलीस आयुक्त संदीप पावले यांनी घटनास्थळा भेट दिली.
त्यांनी परिसरातील लोकांकडून आणि आडत मालकांकडे चौकशी केली.
तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.
माने यांचा वैयक्तिक कारणामुळे खून झाला की मारेकरी दरोड्याच्या हेतूने आले होते.
याचा तपास पोलीस करित आहेत.

‘या’ जिल्ह्यातील मुख्यकार्यकारी अधिकारी अन् जि.प. अध्यक्षांना कोरोनाची बाधा

COVID-19 in India : कोरोनाचा वेग आणखी मंदावला; 24 तासात 1.20 लाख केस, 3380 रूग्णांचा मृत्यू