निष्पाप मुलाचं पोट कापून फेकलं, ‘लिव्हर’ आणि ‘आतडे’ बाहेर पण ‘नशीब’वान असल्यानं वाचला ‘जीव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माणुसकीला काळिमा फासणारी घटना बिहारमध्ये समोर आली आहे. मुंगेर येथील एका लहान मुलाच्या पोटावर धारधार हत्याराने वार करून त्याला फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून तो मुलगा जिवंत राहिला. या मुलाला फेकण्यात आल्यानंतर त्याच्या रडण्याने गावकऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष गेल्यानंतर त्याला पोलिसांच्या मदतीने तात्काळ दवाखान्यात भरती करण्यात आले.
Munger Child
या मुलाला फेकल्यानंतर त्याच्या पोटातील आतडे आणि इतर अवयव अक्षरशः पोटाच्या बाहेर आले होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या तत्परतेने या मुलाचे प्राण वाचले. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आल्यानंतर त्याच्यावर उपचार करून त्याचे अवयव पुन्हा व्यवस्थित करण्यात आले.
Munger
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनडीहा तांती टोला येथील कृष्णा तांती हे पेशाने मिस्त्री असून ते कामावर गेले होते. त्यांची पत्नी घरात जेवण तयार करत होती. त्यामुळे त्यांचा दीड वर्षाचा मुलगा हा बाहेर खेळत होता. मात्र अचानक मुलाच्या रडण्याच्या आवाजाने ग्रामस्थ त्याठिकाणी धावल्याने त्यांनी मुलाला या भयंकर अवस्थेत पाहिले. त्यामुळे नागरिकांमध्ये मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा पसरली. मात्र काही वेळातच हि अफवा खोटी असल्याचे गावकऱ्यांनी मान्य करून या मुलाला उपचारासाठी दवाखाण्यात हलवले.
दरम्यान, पोलीस या प्रकरणी योग्य तो तपास करत असून विविध बाजुंनी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : policenama.com