
BS Yediyurappa | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा राजीनामा, आजच पुर्ण झालेत सरकारचे 2 वर्ष
कर्नाटक : वृत्त संस्था – कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी बी.एस. येदियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकारनं (BJP Government) 2 वर्ष पुर्ण केल्याच्या दिवशीच येदियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, आता सर्वांचं लक्ष नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागले आहे.
राजीनामा देताना येदियुरप्पा म्हणाले, आता मला कर्नाटकच्या लोकांसाठी खुप काम करायचे आहे. आपणा सर्वांना मेहनत घेऊन काम करायला हवं. मी नेहमी अग्नीपरीक्षेतून गेलो असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासुन कर्नाटकमध्ये येदियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू होती. येदियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी नवी दिल्ली जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) यांची भेट घेतली होती.
त्यानंतर पासुनच येदियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली.
आज (सोमवार) अखेर येदियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
आता कर्नाटकचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ration Card वर मिळतील अनेक फायदे, जर अजूनपर्यंत बनवले नसेल तर ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या
Coronavirus | कोरोनापासून बचाव करायचा आहे का? शरीरात होऊ देऊ नका ‘या’ 4 व्हिटॅमिनची कमतरता