BS Yediyurappa’s Granddaughter Suicide | कर्नाटकचे माजी CM येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या; सर्वत्र खळबळ

बंगळुरु : वृत्तसंस्था – BS Yediyurappa’s Granddaughter Suicide | कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांच्या नातीनं शुक्रवारी बंगळुरू (Bangalore) येथे गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याने सर्वत्र खळबळ उडाली (BS Yediyurappa’s Granddaughter Suicide) आहे. सौंदर्या (Soundarya) (वय, 30) असं तीचं नाव आहे. सौंदर्या नीरज ही रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती. तिचे डॉ. नीरज (Dr. Neeraj) यांच्याशी 2019 मध्ये लग्न झाले होते. आज (शक्रवारी) सकाळी 10 च्या सुमारास ही घटना उघड झाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सौंदर्याने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. बोअरिंग हॉस्पिटलमध्ये सौंदर्या यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सौंदर्या यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी सौदर्या यांनी आत्महत्या केल्याचे दिसत असल्याचे पोलीसांनी सांगितले.

 

 

 

माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये त्यांनी आत्महत्या केलीय. येडियुरप्पा यांच्या मोठ्या कन्या पद्मा (Padma) यांची सौंदर्या ही थोरली मुलगी आहे. सौंदर्या यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

Web Title :- BS Yediyurappa’s Grand Daughter Suicide | former karnataka cm bs yediyurappa granddaughter soundarya allegedly dies by suicide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा