विक्रमाच्या उंचीवर शेअर बाजार ! सेंसेक्स पहिल्यांदाच 40,500 च्या वर, झाला 39 हजार कोटींचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापार युद्ध संपण्याच्या आशेमुळे जगभरातील शेअर्स बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. भारतीय शेअर्स बाजारावर देखील याचा परिणाम दिसून आला असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणखी काही पावले उचलण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअर्स बाजाराने मोठी उसळी घेतली आहे.
या निर्णयामुळे सेन्सेक्स पहिल्यांदा 40,500 च्या पार गेला असून निफ्टीमध्ये देखील 75 अंकांची उसळी झाली असून 12 हजाराच्या पार गेली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार असून पैसे कमवण्याची मोठी संधी आहे. यामुळे बाजारात 38 हजार कोटींचा फायदा झाला आहे.

विक्रमी पातळीवर गेला सेन्सेक्स
सेन्सेक्स इतिहासामध्ये पहिल्यांदा 40,500 च्या पलीकडे गेला असून निफ्टी देखील 12 हजारच्या पार गेली आहे. यामुळे छोट्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सची देखील खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असून निफ्टीचा इतिहासातील उच्चांक हा 12,103 आहे.

यामुळे शेअर बाजारात तेजी
वीएम पोर्टफोलियोचे मुख्याधिकारी विवेक मित्तल यांनी सांगितले की, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे सेंसेक्सने उसळी घेतली आहे. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी याचा फायदा घ्यायला हवा. येणाऱ्या दिवसांत देखील सेन्सेक्समध्ये आणि निफ्टीमध्ये देखील वाद झालेली पाहायला मिळणार आहे.

कोटक महिंद्रा:
या कंपनीच्या शेअर्सला मोठी मागणी असून याची किंमत हि 1960 रुपये असून भविष्यात बँकेचा कारभार उत्तम राहणार असून यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमचा फायदा होणार आहे.

मारुती सुझुकी :
या कंपनीचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात तेजीत असून एका शेअर्सची किंमत हि 9000 रुपये ठेवण्यात आली आहे.

Visit : Policenama.com