बीएसएफ जवानाच्या निर्घृण हत्या; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

श्रीनगर : वृत्तसंस्था

जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफचा जवानाची निर्घृणपणे हत्या केली. यामुळे देशभरात आक्रोश व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे जवानाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने विरोधकांनी सरकारवर हल्ला चढविला आहे. सरकार आपल्या फायद्यासाठी सैन्याच्या वापर करत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. आम आदमी सुद्धा या मुद्यावर सातत्याने पाठपुरावा घेत आहे. जवानाच्या हत्येसंबंधी सातत्याने नरेंद्र मोदी यांनी जाब विचारत आहेत.

आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट

जम्मूजवळ असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेवर रायगड सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफ जवान नरेंद्र सिंह यांचं अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. (ना)पाक रेंजर्सनी अमानवीय पध्दतीने आधी नरेंद्र सिंह यांचा गळा चिरला आणि नंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. इतकेच करुन ते थांबले नाही तर त्यांनी नरेंद्र सिंह यांच्या मृतदेहाचीही विटंबना केली. जवान नरेंद्र सिंह यांचा मृतदेह मंगळवारी (19 सप्टेंबर) सापडला होता. आज त्यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंतीम दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला होता. नरेंद्र सिंह हे हरियाणाच्या सोनीपतमधील कला गावचे रहिवासी होते. या घटनेनंतर सुरक्षा दलाने 192 किमी आंतरराष्ट्रीय सीमा आणि 740 किमी नियंत्रण रेषेवर हायअलर्ट जारी केला आहे. नरेंद्र सिंह हे हरियाणाच्या सोनीपतमधील कला गावचे रहिवासी होते.

तिरंग्यात अखेरचा निरोप मिळणे अभिमानाची बाब….

पाकिस्तानच्या नापाक हरकतीवर कारवाई करण्याची मागणी शहीद नरेंद्र सिंह यांच्या कुटुंबियांनी केली आहे. “आमच्यासाठी हा अभिमानाचा विषय आहे. प्रत्येकाला तिरंग्यात अखेरचा निरोप मिळत नाही. पण आम्ही फक्त अभिमान बाळगून शांत राहणार नाही. आम्हाला आज अभिमान आहे, उद्या आणखी कोणी शहीद होईल आणि पुन्हा अभिमान वाटेल. पण सरकारने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे,” असं नरेंद्र सिंह यांचा मुलगा म्हणाला.

सरकारची सैनिकांबद्दलची भुमिकेबद्दल कुटुंबियांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “आज आम्हाला अभिमान आहे. पण दोन ते तीन दिवसांनंतर काय होणार, जेव्हा आम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही? मी आणि माझा भाऊ बेरोजगार आहोत. माझे वडील हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. कुटुंबाचे आधार होते. देशसेवा करताना त्यांना वीरमरण आलं. ज्या गोष्टींची आम्हाला गरज आहे, त्या प्रशासनाने द्याव्यात,” असंही नरेंद्र सिंह यांचा मुलगा म्हणाला.

“आधी हेमराज, आता नरेंद्र सिंह. पाकिस्तानने त्यांची निर्घृणपणे हत्या केली. सरकार काय करत आहे. मोदीजी तुमचं मन तुम्हाला खात नाही? 56 इंचाची छाती कुठे गेली आणि कुठे गेले लाल डोळे? एकाच्या मोबदल्यात 10 शीर आणण्याचं आश्वासन कुठे विरलं? सरकारला जवानांची काळजी नाही. मोदी आपल्या सैन्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहेत, पण त्यांच्या सुरक्षेचा विचार करत नाहीत. देशाला उत्तर हवं आहे आणि तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल.” असा खणखणीत आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

[amazon_link asins=’B0778JFC13,B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’232a4bc4-bcbf-11e8-b9b8-7d654cefd6ee’]