‘कोरोना’ काळात देखील ‘या’ राज्यात पाकिस्तानची सुरू होती घुसखोरी, BSF केला ‘खात्मा’

बाडमेर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना काळात सुद्धा पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु आहेत. पाकिस्तानचा एक तरुण रात्री उशिरा १ च्या सुमारास भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या तयारीत होता. मात्र, बीएसएफ जवानांनी त्याचा हा प्रयत्न उधळून लावला आहे. बाडमेर जिल्ह्यातील बाखासर पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना समोर आहे.

तरुणाला बीएसएफ कडून बॅरिकेडजवळ पोहचताच इशारा देण्यात आला होता. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. सतत चेतावणी दिल्यानंतर देखील तरुण हा काटेरी बॅरिकेडजवळ आला. त्यानंतरही बीएसएफ जवानांनी त्याला इशारा दिला. पण तरी सुद्धा तो मागे झाला नाही आणि बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मात्र, बीएसएफने घुसखोरावर गोळीबार सुरु केला. त्यात घुसखोराचा जागीच मृत्यू झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्यासाठी पाकिस्तान असे कृत्य करु शकते. त्याच्या पाठीमागे कोणतेही मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारु शकत नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच बीएसएफने स्थानिक पोलिसांना सुद्धा याची माहिती दिली. त्यानुसार बाखासर पोलीस ठाण्याचे ठाणाधिकारी सी ओ चौहान घटनस्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनसाठी पाठवला. पाकिस्तानने आपल्या नागरिकाचा मृतदेह ताब्यात घ्यावा, अशी माहिती देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान हा मृतदेह ताब्यात घेणार की नाही हे पाहावं लागणार आहे.