सीमेवर तैनात असताना IAS ची तयारी, ५ व्या प्रयत्नात BSF जवान बनला सुपर क्लास-१ अधिकारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट देखील शक्य करता येऊ शकते. बॉर्डर सेक्युरिटी दलाचा (BSF) माजी अधिकारी हरप्रीतसिंह यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. जी परीक्षा पास होण्यासाठी देशभरातील हजारो युवक युवती प्रयत्न करतात ती केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन हरप्रीतसिंह IAS झाले आहेत. पाचव्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले असून पहिल्या २० जणांमध्ये त्यांना स्थान मिळाले आहे. त्यांना १९ वी रँक मिळाली आहे.

२०१६ ते २०१७ असे अशी एक वर्षे हरप्रीत यांनी BSF नोकरी केली. IAS अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. हरप्रीत सिंह यांचे हे स्वप्न साकार झाल्यावर त्यांनी म्हंटले की, दृढ निश्चय आणि मेहनत हा यशाचा साधा सोपा मंत्र आहे. हरप्रीतसिंह २०१६ साली UPSC परीक्षा पासून सहाय्यक कमांडट म्हणून BSF मध्ये रुजू झाले.

बीएसएफमध्ये रुजू झाल्यानंतर भारत-बांगलादेश सीमेवर हरप्रीतसिंह तैनात होते. कामाचे व्यस्त वेळापत्रक असले तरी मला त्यात आनंद मिळायचा असे हरप्रीत यांनी सांगितले. देशाच्या सीमेवर कर्तव्य निभावत उरलेल्या इतर वेळेत त्यांनी लोकसेवा आयोगाची तयारी केली. ते ट्रेड सर्व्हिससाठी पात्र ठरले होते.

देशाच्या सीमेवर डयुटी बजावत असतानाही आयएएसचे उद्दिष्टय पूर्ण करण्यासाठी हरप्रीत अभ्यासासाठी वेळ काढायचे. हरप्रती इंडियन ट्रेड सर्व्हीससाठी पात्र ठरले होते. त्यांनी पुन्हा प्रवेशपरीक्षा देऊन आयएएसमध्ये १९ वा क्रमांक मिळवला. त्यांनी गेल्या वर्षी परीक्षा देऊन हे यश मिळविले.