BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दलात पुरुष आणि महिलांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (Border Security Force, BSF) म्हणजेच सीमा सुरक्षा दलामध्ये ग्रुप ‘बी’ आणि ग्रुप ‘सी’ पदांवर भरती निघाली (BSF Recruitment 2021) आहे. BSF च्या भरती प्रक्रियेंतर्गत एअर विंग (Air wing), पॅरा मेडिकल (Para Medical) आणि वेटरनरी स्टाफसाठी (Veterinary staff) रिक्त पदांवर भरती (Recruitment to vacant posts) केली जाणार आहे. या पदांसाठी पुरुष आणि महिला उमेदवार (Male and female candidates) ऑनलाइन अर्ज (Apply online) करु शकतात. अर्ज करण्यासाठी BSF च्या अधिकृत वेबसाईट (Official website) https://bsf.gov.in/Home वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत (Deadline) 26 जुलै 2021 आहे.

पदांची माहिती आणि एकूण पदे

पॅरा मेडिकल स्टाफ (Para medical staff)

एसआय (स्टाफ नर्स) SI (Staff Nurse) ग्रुप बी पोस्ट -37 पदे
एएसआय (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) ASI (Operation Theater Technician) ग्रुप सी पोस्ट – 1 पद
एएसआय (लॅब टेक्निशियन) ASI (Lab Technician) ग्रुप – सी पोस्ट – 28 पदे
सीटी (वॉर्ड बॉय, वॉर्ड गर्ल) CT (Ward Boy, Ward Girl) ग्रुप सी पोस्ट – 9 पदे

वेटर्नरी स्टाफ (Veterinary staff)
एचसी (वेटर्नरी) HC (veterinary) ग्रुप सी पोस्ट – 20 पदे
कॉन्स्टेबल (केनेलमन) Constable (Kennelman) ग्रुप सी पोस्ट – 15 पदे

एअर विंग (Air wing)
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इन्स्पेक्टर) Assistant Aircraft Mechanic (Assistant Sub Inspector) – 49 पदे
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इन्स्पेक्टर) Assistant Radio Mechanic (Assistant Sub Inspector) – 8 पदे
कॉन्स्टेबल Constable – 8 पदे

कसे करायचे रजिस्ट्रेशन

इच्छूक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना सर्वात आधी BSF च्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागले. वन टाइम प्रोफाइल (One time profile) भरून आपले रजिस्ट्रेशन (Registration) करावे लागेल. विचारलेली संपूर्ण माहिती (Complete information) भरावी लागेल. यानंतर अलीकडच्या काळात काढलेले छायाचित्र, अंगठ्याचे निशाण अपलोड करावे लागले.

वयोमर्यादा
विविध पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षा दरम्यान असले पाहिजे. याशिवाय आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या (Central Government) नियमानुसार सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी BSF च्या अधिकृत पोर्टलवरील नोटिफिकेशन (Notification) वाचावे.

BSF च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक कार
https://bsf.gov.in/Home


Web Title :- 
BSF Recruitment 2021 | bsf is hiring for asi and constable posts under air wing apply now bsf gov in

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

Ladakh Standoff | 70 वर्षात वर्षात पहिल्यांदा भारताने बदलली भूमिका, चीनसोबत सीमेवर पुन्हा तैनात केले 50,000 सैनिक