BSF Recruitment 2022 | 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! BSF मध्ये तब्बल 2788 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSF Recruitment 2022 | सीमा सुरक्षा बल (Border Security Force) इथे लवकरच भरती घेण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी (BFS recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी या भरतीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन (Online) पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे – एकूण जागा 2788

  • कांस्टेबल ट्रेड्समैन (Constable Tradesman)
  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

कांस्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता 10 वी पूर्ण केलं असणं आवश्यक.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त किंवा शासनमान्य संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
  • उमेदवारांना 2 किंवा 1 वर्षाचा संबंधित ट्रेडमधील अनुभव आवश्यक. किंवा उमेदवारांनी ट्रेडमधील ITI पूर्ण केलं असणं आवश्यक.
  • उमेदवारांनी निवडीसाठीच्या सर्व अटी शर्थी आणि पात्रता पूर्ण करणं आवश्यक.

शारीरिक पात्रता उंची –

  • पुरुष = 167.5 सेमी आणि महिला = 157 सेमी. छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी.
  • अनुसूचित जाती/जमाती/आदिवासी- उंची : पुरुष = 162.5 सेमी आणि महिला = 155 सेमी. छाती (केवळ पुरुषांसाठी): 76-81 सेमी.
  • डोंगराळ भागातील उमेदवार- उंची : पुरुष = 165 सेमी आणि महिला = 150 सेमी. छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी

वयाची अट – 18 वर्षे ते 23 वर्षे

  • वेतन – 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रतिमहिना (BSF Recruitment 2022)

भरती शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी – 100 रुपये
  • मागासवर्गीयांसाठी – निःशुल्क

ही कागदपत्रे आवश्यक –

  • Resume (बायोडेटा)
  •  10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1RfDwbbL2i_QF3bTmN5OHVfgHZ0RSEgje/view

अर्ज करण्यासाठी – http://www.bsf.nic.in/

 

Web Title : BSF Recruitment 2022 | army jobs bsf tradesman recruitment 2022 sarkari naukri government jobs

हे हि वाचा

IPS Cadre Allocation Maharashtra | केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील ‘या’ 14 पोलिस अधिकार्‍यांना IPS केडर; जाणून घ्या नावे

Pune Crime | पुण्यात MPSC ची तयारी करणार्‍या अन् मुळच्या सांगलीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; भाऊ पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पोलिस उपनिरीक्षक

 

Tejashwi Prakash | ‘नागिन’ बनणार असल्याची चर्चा रंगताच तेजस्वी प्रकाशचे ‘हे’ सगळे फोटो व्हायरल

 

Indian Railway Recruitment 2022 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय रेल्वेत क्रीडा कोट्या अंतर्गत भरती; जाणून घ्या

 

Sundar Pichai Google | काय सांगता ! होय, ‘गुगल’ला खुपच आवडलं भाड्याचं ऑफिस, आता 7400 कोटींना ‘खरेदी’…

 

Multibagger Super Stocks | ‘या’ आठवड्यातील स्टॉक – एकाने 90% रिटर्न्स दिला तर बाकीचे 50% पेक्षा जास्त पुढे

 

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरने व्यक्त केल्या तिच्या वेदना, म्हणाली – ‘आजकाल ‘या’ गोष्टीला मिस करतेय’