बीएसएफ जवान मृत्यू प्रकरण; पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

वाशिम : पोलीसनामा आॅनलाईन

बीएसएफ जवान सुनील धोपे यांच्या मृत्यू प्रकरणी बीएसएफच्या पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील धोपेंचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा दावा त्यांच्या कुटूंबीयांनी केला होता. यासाठी वाशिममध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता.

बीएफएसच्या अधिकाऱ्यांनी धोपे कुटूंबीयांची भेट घेऊन त्यांना चाैकशी करण्याचे आश्वासन दिले, आणि बीएसएफच्या पाच अधिकाऱ्यांवर कारंजा पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड गावचे रहिवासी सुनील धोपे मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. बीएसएफ च्या म्हणण्यानुसार त्यांनी आत्महत्या केली होती, मात्र कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. कुटुंबीयांच्या मते, त्यांचा घातपात झाला आहे, त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि धोपेंना शहिदाचा दर्जा द्या, अशी मागणी कुटुंबीयांनी केली होती. याप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी कारंजा पोलीस स्टेशनला धोपे कुटूंबीयांकडून तक्रार देण्यात आली होती.

नक्षली कमांडरचा दावा; वरवरा राव नक्षलवाद्यांचे मार्गदर्शक
जोपर्यंत दोषींवर कारवाई होणार नाही तोपर्यंत धोपेंचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याची भूमिका कुटूंबीयांनी घेतली होती. त्यामुळे धोपे यांचे पार्थिव अजूनही अमरावतीत शितग्रहात ठेवण्यात आले आहे. मात्र आता पाच जणांवर कारवाई करण्यात आल्यामुळे धोपे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c24746aa-bbf6-11e8-8014-b3d6787647e0′]