BSNL चा स्वस्त अन् मस्त प्लान ! 90 GB डेटा अन् मोफत कॉलिंग, जाणून घ्या किंमत आणि वैधता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त प्रीपेड प्लान उपलब्ध केला आहे. बीएसएनएलचा हा प्लान अगदी स्वस्त अन् मस्त आहे. कंपनीच्या सर्व प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड ऑफर मिळत आहे. बीएसएनएलच्या या सर्वोत्तम प्लानमध्ये 90 जीबी हाय-स्पीड डेटा सोबतच मोफत कॉलिंगची सुविधा मिळते.

BSNL चा 699 रुपयाचा प्लान

BSNL च्या या प्रीपेड प्लॅनची वैधता 180 दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज 500 एमबी म्हणजे एकूण 90 जीबी डेटा मिळतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस सुविधा मिळेल. परंतु, या प्लानमध्ये अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार नाही.

फायबर टू होम

BSNL कंपनी काही ठराविक भागात ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट वापरण्यास देखील देत आहे. यामध्ये मुरादाबादचा समावेश आहे. ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 450 रुपये खर्च करावे लागतील. यानंतर 3300 जीबी टेडा वापरण्यास मिळेल. तसेच मोफत कॉलिंगची सुविधा देखील यामध्ये देण्यात आली आहे. कंपनीने फायबर टू होमवर 449 रुपयांचा प्लान आपल्या ग्रहकांसाठी आणला आहे. ही योजना केवळ 90 दिवसांसाठी लागू आहे.

टेलिफोनची सुविधा मिळणार

फायबर टू होम कनेक्शन घेणाऱ्यांना इंस्टॉलेशन चार्जेस द्यावे लागणार नाहीत. कनेक्शन घेणाऱ्याला 3300 जीबी डेटा मिळेल. याचा स्पीड 33 मेगाबाइट प्रति सेकंद आहे. हा डेटा समाप्त झाल्यानंतर दोन एमबीपीएस वेगाने इंटरनेट चालेल. यासोबतच टेलिफोनची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. कनेक्शन घेतल्यानंतर तीन महिन्यांनी हा प्लान 599 रुपये प्रति महिन्यात बदलेल.

कोरोनामुळे प्लॅनला मागणी

BSNL ने हा प्लान मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात केरळमध्ये लागू केला होता. वर्क फ्रॉम होममुळे या प्लानला मागणी वाढली होती. प्लॅनच्या लोकप्रियतेमुळे आता देशभरात हा प्लान लागू करण्यात आला आहे. उपमहाव्यवस्थापक बीके शर्मा यांनी यासंदर्भात सांगितले की, या प्लॅनची मागणी वाढली आहे. कर्मचारी फोनवर कनेक्शन बाबत विचारणा करतात, त्यानंतर कर्मचारी फॉर्म भरण्यासाठी ग्राहकांकडे जातात.