BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

पोलीसनामा ऑनलाईन : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आपल्या वापरकर्त्यांना मर्यादित काळासाठी विनामूल्य 4 जी सिम कार्ड देत आहे. बीएसएनएल पूर्वी निवडक टेलिकॉम सर्कलसाठी अशा ऑफर देत होता. यावेळी ऑफरही पूर्वीसारखीच आहे. मात्र, यावेळी केवळ केरळ सर्कलमधील रहिवासी या सुविधेचा ग्राहक लाभ घेऊ शकतात.

वास्तविक, बीएसएनएलच्या 4 जी सिम कार्डची किंमत 20 रुपये आहे, परंतु ग्राहकांना काही अटींसह यात सवलत दिली जात आहे. ही ऑफर 23 जानेवारीपासून सुरू झाली असून फक्त 31 जानेवारी 2021 या मर्यादित काळासाठी आहे. सध्याच्या ऑफरनुसार बीएसएनएलने अधिकृत रिलीज जारी केले आहे कि, केरळमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना 31 जानेवारी 2021 पर्यंत 4 जी सिम विनामूल्य मिळू शकेल. तसेच, ही ऑफर फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना त्यांचा नंबर बीएसएनएलकडे पोर्ट करायचा आहे.

बीएसएनएल कडून ही एक जाहिरात ऑफर आहे आणि ज्या वापरकर्त्यांनी 100 किंवा त्याहून अधिक किंमतीच्या फर्स्ट रिचार्ज कूपन (एफआरसी) ची सदस्यता घेतली आहे त्यांच्यासाठीच आहे. म्हणजेच 100 रुपयांच्या एफआरसीसह रीचार्ज करणार्‍या कोणत्याही ग्राहकाला कोणतेही नवीन शुल्क न आकारता नवीन 4G सिम कार्ड मिळेल. काही दिवसांपूर्वी बीएसएनएलनेही चेन्नई आणि तामिळनाडू सर्कलच्या वापरकर्त्यांसाठी अशीच ऑफर आणली होती. दरम्यान, ही ऑफर 8 जानेवारी रोजी संपली.

विनामूल्य बीएसएनएल 4 जी सिम कार्ड कसे मिळवायचे?
MNP Port-In किंवा नवीन ग्राहक केरळ सर्कल जवळील कोणत्याही बीएसएनएल स्टोअर किंवा बीएसएनएल रिटेल दुकानात जाऊन विनामूल्य 4 जी सिम कार्ड मिळवू शकतात. दरम्यान, सिमकार्ड मिळविण्यासाठी, वापरकर्त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. माहितीनुसार, बीएसएनएलच्या या 4 जी सिम कार्डला बरेच फायदे दिले जात आहेत. कंपनीने वापरकर्त्यांसाठी व्हॉईस कॉलिंग मर्यादा दररोज 250 मिनिटांनी हटवून अमर्यादित केली आहे. कंपनी प्रत्येक प्रीपेड योजनेसह 100 एसएमएस करण्याचीही ऑफर देत आहे. अलीकडेच बीएसएनएलने 398 रुपयांची नवीन प्रीपेड योजनाही सादर केली आहे. या योजनेत 30 दिवस अमर्यादित डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दिले जात आहेत.