‘BSNL’ च्या ग्राहकांना फक्त 399 रुपयांत ‘Amazon prime’ ची ‘मेंबरशिप’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL ने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. आता BSNL ग्राहकांना एका वर्षाच्या अमेझॉन प्राइमचा आनंद घेता येणार आहे. आता अमेझॉन प्राइमच्या सदस्यतासाठी ३९९ रुपये भरावे लागतील. म्हणजेच ३९९ रुपयात वर्षभर अमेझॉन प्राइमची सुविधा घेऊ शकतात. BSNL आणि अमेझॉन एक वर्ष अमेझॉनची प्राइम सदस्यता ९९९ रुपयांच्या जागी ३९९ रुपयात देणार आहे. ही ऑफर नव्या आणि जुन्या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

यात प्राइम व्हिडिओ देखील सहभागी आहे. त्यामुळे BSNL ग्राहकांना प्राइम व्हिडिओवर कधीही कोठेही विविध सिनेमे आणि टीव्ही शोचा आनंद मिळू शकतो. यात ग्राहक अनेक हॉलिवूड, बॉलिवूड आणि देशविदेशातील अनेक वेबसिरिज पाहू शकतात. याशिवाय अमेझॉन प्राइमवर नुकतेच आलेले सिनेमे सर्वात आधी दाखवण्यात येतात. यावर अनेक सुपरहीट सिनेमे आहेत, ज्याचा आनंद तुम्हाला घेता येईल.

बीएसएनएल कॅशबॅक –
प्राइम मेंबरशिप अंतर्गत बीएसएनएल ४९९ रुपये पर्यंतच्या ब्रॉडबॅंड प्लॅनवर १५% कॅशबॅक, ४९९ रुपये आणि ९०० रुपयांपर्यंतच्या प्लॅनवर २०% कॅशबॅक, ९०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक ब्रॉडबॅंड प्लॅनवर २५% कॅशबॅक देण्यात येणार आहे. BSNL वार्षिक प्लॅनवर १५ टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like