499 रुपयात 100 GB डेटा ! Jio-Airtel पेक्षा BSNL चा बेस्ट प्लॅन ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीएसएनएलचा (Bharat Sanchar Nigam Limited – BSNL) 499 रुपयांचा भारत फायबर प्लॅन अनेक परिसरात एक एन्ट्री लेव्हल प्लॅन आहे. बीएसएनएलनं या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये नुकताच बदल केला आहे. या प्लॅनमध्ये बीएसएनएलनं 50 Mbps च्या स्पीडवर 100 GB डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्लॅनची तुलना ही जिओ फायबर आणि एअरटेल एक्स्ट्रिम फायबर सोबत केली जात आहे.

499 रुपयांचा Bharat Fiber Plan

या प्लॅनमध्ये 100 GB पर्यंत डेटा असेल. याचा स्पीड 50 Mbps चा असेल. मर्यादा संपल्यानंतर हा स्पीड 2 Mbps होतो. यात ग्राहक सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल (Unlimited Calling) करू शकतात. यात कोणत्याही प्रकारच्या ओटीटी अ‍ॅप्सचं (OTT Apps) सब्सक्रिप्शन मिळत नाही. अनेक परिसरात कंपनी हा 499 रुपयांचा प्लॅन ऑफर करते. ज्यात 30 Mbps च्या स्पीड सोबत 3.3 TB डेटा दिला जातो.

399 रुपयांचा Jio Fiber Paln

जिओनं (Jio) ऑफर केलेला हा प्लॅन बीएसएनएलच्या 499 रुपयांच्या प्लॅनसारखाच आहे. यात 30 Mbps च्या स्पीडनं 3.30 TB (3,333 GB) डेटा ऑफर केला जातो. यात ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. बीएसएनएल प्रमाणेच यात कोणत्याही ओटीटी अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळत नाही.

499 रुपयांचा Airtel Xstrem Fiber Plan

बीएसएनएल आणि जिओ यांच्या प्रमाणेच एअरटेलाच हा प्लॅन देखील 3.3 TB डेटा ऑफऱ करतो. यात 40 Mbps स्पीड दिला जातो. तसंच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिलं जातं. या प्लॅनची खास बात अशी की, यात Voot Basic, Hungama Play, Eros Now, Ultra, Shemroo Me अशा ओटीटी प्लॅटफॉर्मची मेंबरशिप दिली जाते.

You might also like