BSNL च्या 200 रुपयांपेक्षा कमीच्या प्लानने केला धमाका, 100 दिवसांची व्हॅलिडिटी आणि डेटा, कॉल्स फ्री; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL | देशातील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल एअरटेल (Airtel), व्हीआय (Vodafone Idea) सारख्या खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी अनेक प्रकारचे प्लॅन उपलब्ध करून देत आहे. इतर कंपन्या त्यांच्या प्लॅनच्या किमती वाढवत असताना, बीएसएनएलने गेल्या काही महिन्यांत चांगले प्लॅन आणले आहेत. (BSNL)

 

त्याचप्रमाणे BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम प्लान लाँच केला आहे. त्याची किंमत 197 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटासह 100 दिवसांची वैधता दिली जात आहे.

 

या प्लान अंतर्गत यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेली डेटा आणि फ्री SMS चे फायदे दिले जात आहेत, 197 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 100 दिवसांची वैधता मिळते. अनेक वापरकर्त्यांसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

 

कंपनीने या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस ऑफर केले आहेत.
या सर्व सेवा फक्त 18 दिवसांसाठी आहेत. याचा अर्थ वापरकर्त्यांना 100 दिवसांची वैधता मिळते, परंतु या सेवा केवळ 18 दिवसांसाठी उपलब्ध आहेत. 18 दिवसांनंतर यूजर्सना 40KBPS च्या स्पीडने डेटा मिळेल. फ्री कॉलिंगची सुविधा संपुष्टात येईल, पण इन्कमिंग कॉल येत राहतील.

 

या प्लॅनमध्ये तुम्हाला Zing अ‍ॅपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
एकदा हे फायदे संपले की, तुम्हाला सर्व फायद्यांसाठी पुन्हा रिचार्ज करावे लागेल.
तुम्ही टॉप – अप देखील करू शकता.
हा प्लान त्या लोकांसाठी परफेक्ट जे केवळ जास्त कॉल रिसिव्ह करतात आणि जास्त डेटा आणि कॉलिंगचा वापर करत नाहीत.

 

Web Title :- BSNL | bsnl 197 rupees 100 days validity and data calls are free

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा