पुढील २४ तासात बंद होईल BSNL चे सिम, ग्राहकांना पाठवली जातेय नोटीस, जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL | नुकताच सोशल मीडिया (Social Media) वर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे (BSNL) सिम येत्या २४ तासांत बंद होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुम्हालाही कंपनीकडून अशी कोणतीही नोटीस (Notice) मिळाली असेल, तर प्रथम येथे सत्य जाणून घ्या.

 

२४ तासात ब्लॉक होईल SIM
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की TRAI ने ग्राहकांचे केवायसी (KYC) निलंबित केले आहे आणि येत्या २४ तासांत बीएसएनएलचे (BSNL) सिम ब्लॉक केले जाईल. मात्र, सरकारी फॅक्ट चेक संस्था पीआयबीने (PIB Fact Check) हा दावा फेटाळून लावला आहे.

PIB Fact Check ने दावा फेटाळला
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावादरम्यान, फेक न्यूज वेगाने पसरते. अशा परिस्थितीत, सरकारने एक फॅक्ट चेक संस्था स्थापन केली आहे, जी अशा खोट्या बातम्या किंवा दाव्यांचे खंडन करते. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये सांगण्यात आले आहे की हा दावा खोटा आहे आणि कंपनीकडून अशी कोणतीही नोटीस पाठवली जात नाही. एवढेच नाही तर पीआयबी फॅक्ट चेकने असेही म्हटले आहे की, तुमचे पर्सनल आणि बँक डिटेल्स कधीही इतरांसोबत शेअर करू नका.

 

काय आहे PIB फॅक्ट चेक?
पीआयबी फॅक्ट चेक सोशल मीडियावर व्हायरल झालेले फेक मेसेज किंवा पोस्ट समोर आणते आणि त्यांचे खंडन करते.
ही संस्था सरकारी धोरणे आणि योजनांबद्दल चुकीच्या माहितीचे सत्य समोर आणते.
तुम्हालाही एखाद्या व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल,
तर तुम्ही मोबाईल क्रमांक ९१८७९९७११२५९ किंवा [email protected] वर मेल करू शकता.

 

Web Title :- BSNL | bsnl customers get notice sim will closed in next 24 hours kyc suspended by trai here you know this viral message reality

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स