BSNL | नवीन वर्षात ‘बीएसएनएल’ने दिला यूजर्सला धक्का, बंद केले आपले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने १ जानेवारी २०२३ पासून आपले अत्यंत स्वस्त ब्रॉडबँड रिचार्ज प्लान बंद केले आहेत. या प्लानमध्ये २७५ रुपयांचे आणि रु ७७५ च्या प्लानचा समावेश आहे. हे सर्व प्लान २०२२ च्या स्वातंत्र्यदिनी सादर केले होते. BSNL च्या या प्लान्समध्ये १०० Mbps च्या स्पीडने इंटरनेट सुविधा देण्यात आली होती. तसेच, यात यूजर्सना ३३०० TB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा होती. या प्लानसह ७५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती. बीएसएनएलचे (BSNL) हे प्लान गेल्या महिन्यातच बंद केले जाणार होते, परंतु कंपनीने एक्सपायरी डेट वाढवली होती. यापूर्वी असे म्हटले जात होते की, हे प्लान कंपनी कायमस्वरूपी ठेवू शकते. परंतु १ जानेवारीपासून हे प्लान बंद करण्यात आले आहेत.

प्लानमध्ये मिळत होते हे लाभ

या ब्रॉडबँड प्लानमध्ये दीर्घ वैधता आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा मिळत होती. बीएसएनएलच्या रु. २७५ च्या दोन्ही प्लानसह, एकूण ३.३ TB एकुण डेटा मिळत होता, जो ७५ दिवसांच्या वैधतेसह आला होता.

२७५ रुपयांच्या एका प्लानमध्ये ३० Mbps इंटरनेट स्पीड आणि दुसऱ्या प्लानमध्ये ६० Mbps इंटरनेट स्पीड मिळत होता. प्लानसोबत अनलिमिटेड कॉलिंग होते. मात्र, योजनेसोबत ओटीटी सेवा मिळत नव्हती.

बीएसएनएलच्या (BSNL) ७७५ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानबद्दल बोलायचे झाले तर,
७५ दिवसांची व्हॅलिडिटी देखील त्याच्यासोबत मिळत होती. प्लानमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट
सुविधा दिली जात होती. यूजर्सना ३३०० टीबी एकूण हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळत होता.
या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग देखील होते.

BSNL च्या रु. ७७५ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये Zee5, Voot, Yupp TV, Disney+ Hotstar, Shemaroo,
Lionsgate आणि Hungama चे OTT फायदे देखील मिळत होते. मात्र, आता हे प्लान बंद केले आहेत.

Web Title :- BSNL | bsnl has removed its super affordable broadband plans offer from 1 january

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत, या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ’

CM Eknath Shinde | छत्रपती संभाजी महारांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटाकडून अजित पवारांची पाठराखन; याबाबत मुख्यमंत्र्यांना सुनावत म्हणाले…

Sneha Ullal |अभिनेत्री स्नेहा उल्लालने ‘या’ कारणामुळे एका हॉलीवुड प्रोजेक्टला दिला नकार; म्हणाली “एवढी नग्नता …”