BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त Plan! महिन्याभर रोज मिळेल 2GB डेटा; Jio-Airtel यूजर Shock मध्ये

नवी दिल्ली : BSNL (Bharat Sanchar Nigam Limited) ने ग्राहकांसाठी दोन नवीन मंथली रिचार्ज प्लान जाहीर केले आहेत. BSNL ने सांगितले की ते 1 जुलै 2022 रोजी यूजर्ससाठी दोन नवीन प्रीपेड प्लान जारी करत आहेत. या दोन नवीन प्लॅनची किंमत रु. 228 आणि रु 239 (BSNL Announces Rs 228 and Rs 239 Plans) असेल.

 

दोन्ही प्लान ग्राहकांना मंथली व्हॅलिडिटी प्लान (Monthly Validity Plan) सह ऑफर केल्या जातील. बीएसएनएलने सांगितले की, दोन्ही प्लानची रिचार्ज तारीख दर महिन्याला सारखीच असेल. बीएसएनएलच्या या दोन नवीन प्रीपेड प्लान्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

 

BSNL Rs 228 Prepaid Plan

बीएसएनएलचा 228 रुपयांचा प्रीपेड प्लान मंथली व्हॅलिडिटीसह येतो. प्लान अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 2जी डेली डेटासह मिळेल, त्यानंतर स्पीड 80 केबीपीएस आणि 100 SMS/दिवस होतील. बीएसएनएल या प्लानसह ग्राहकांसाठी प्रोग्रेसिव्ह वेब अ‍ॅपवर चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सर्व्हिस देखील बंडल करेल.

 

BSNL Rs 239 Prepaid Plan

बीएसएन 239 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 2जीबी डेली डेटासह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 10 रुपयांच्या टॉकटाइमसह 100 एसएमएस/दिवस मिळतील. 2जीबी डेटा वापरल्यानंतर इंटरनेटचा वेग 80 Kbps होईल. या प्लानमध्ये गेमिंगचे फायदेही दिले जातात. यूजरच्या मुख्य खात्यात टॉकटाइम जोडला जाईल.

 

महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला हा प्लान्स रिचार्ज केल्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेला प्लानसह पुन्हा रिचार्ज करावे लागेल. हे दोन्ही प्लान Airtel, Jio, Vodafone Idea च्या मंथली प्लानला टक्कर देण्यासाठी लाँच करण्यात आले आहेत.

 

Web Title :- BSNL | bsnl launched rs 228 and rs 239 monthly recharge
prepaid plan 2gb per day unlimited calling check benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा